ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात फेसबुक, युट्युब या डिजिटल माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

author img

By

Published : Jun 21, 2020, 4:48 PM IST

Updated : Jun 21, 2020, 9:40 PM IST

फेसबुक, युट्युब यासारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करत नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. जिल्हा क्रीडा अधिकारी आणि विविध संस्थांनी योग दिवसानिमित्त वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये 390 कुटुंबे सहभागी झाली होती.

Yoga day celebration in nashik
नाशिकमध्ये योगा दिवस साजरा

नाशिक - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिवस घरीच कुटुंबासमवेत साजरा करण्याचे आवाहन आयुष मंत्रालयाने केले होते. या आवाहनला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यात फेसबुक, युट्युब या डिजिटल माध्यमाचा वापर करत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मराठा विद्या शिक्षण प्रसारक समाज नाशिकचे के. एस‌. के. डब्ल्यू. महाविद्यालय , इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, सूर्य फाऊंडेशन यांच्या वतीने ऑनलाइन कॉमन योगा प्रोटोकॉलच्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्यात फेसबुक, युट्युब या डिजिटल माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नाशिकमधील राष्ट्रीय योग शिक्षिका दर्शना राजपूत यांनी योग प्रात्यक्षिक करुन दाखवली. वेबिनारद्वारे योग प्रशिक्षणामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. नित्य आसन,ओंकार, प्राणायाम, शुध्दीक्रिया व ध्यान धारणा करण्यात आली. यामध्ये पाच प्रकारचे विविध आसन करण्यात आले.

या कार्यक्रमात जवळपास 390 परिवार नाशिक जिल्हा तसेच विविध जिल्ह्यांतून सहभागी झाले. सर्वांनी विविध योगासने, प्राणायाम प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा संचालक, क्रीडा अधिकारी यांनी योग दिवसानिमित्त मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Last Updated : Jun 21, 2020, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.