ETV Bharat / state

शिवसेनेचा भाजपाला दे धक्का! दोन बडे नेते शिवबंधन बांधणार - वसंत गिते शिवसेना प्रवेश

माजी आमदार वसंत गिते व सुनील बागूल यांनी काही वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. हे दोन्ही नेते आता पुन्हा शिवसेनेत येत आहेत. आज या दोघांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

Vasant Gite and Sunil Bagul
वसंत गिते व सुनील बागूल
author img

By

Published : Jan 8, 2021, 11:03 AM IST

नाशिक - शिवसेनेने नाशिकमध्ये भाजपला जोरदार धक्का दिला आहे. माजी आमदार वसंत गिते व सुनील बागूल हे दोन्ही दिग्गज नेते आज (शुक्रवार ) सायंकाळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत.

दोन्ही नेते मुळचे शिवसैनिक

गेल्या पाच वर्षात वसंत गिते व सुनिल बागूल यांची भाजपामध्ये केवळ आश्वासनांवर बोळवण झाली. आता राज्यात भाजपा विरोधी पक्षात आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही नेते मुळचे शिवसैनिक असल्याने त्यांच्या स्वगृही परतण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोन्ही नेत्यांच्या सेना प्रवेश भ‍ाजपाला मोठा दणका समजला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिव बंधन बांधतील.

भाजपाला धक्का

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपामध्ये प्रेवश केला होता. नाशिक महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेसाठी तो मोठा धक्का होता. मात्र त्याची सव्याज परतफेड शिवसेनेने केली आहे. नाशिकमधील भाजपच्या दोन बड्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यात यश आले आहे.

दोन्ही नेते होते नाराज

वसंत गिते व सुनिल बागूल हे दोन्ही नेते भाजपामध्ये गेल्यापासून नाराज होते. त्यांना सुरूवातीला प्रदेश उपाध्यक्षम्हणून नेमण्यात आले होते. मात्र त्यानंतर नव्या कार्यकारणीत त्यांना स्थान देण्यात आले नाही. शिवाय स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांना पक्षाने झुकते माप दिले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांत नाराजी होती. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. या दोघांच्या प्रवेशाने शिवसेनेला महापालिका निवडणूकीत मोठा फायदा होऊ शकतो.

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी सर्वांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाई लढू; शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.