ETV Bharat / state

नाशकात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात - नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारपासून सुरू होणाऱ्या उत्सवासाठी मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

श्री कालिका देवी मंदिर, नाशिक
author img

By

Published : Sep 28, 2019, 6:16 PM IST

नाशिक - नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिराला तीनशे वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारपासून सुरू होणाऱ्या उत्सवासाठी मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे

यावर्षी धार्मिक कार्यक्रमासोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाच्यावतीने विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता मंदिरात परिसरात येण्या-जाण्याच्या मार्गावर वॉटरप्रुफ मंडप टाकण्यात आला. तसेच महिला, पुरुषांसह दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने मंदिर परिसरात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, 60 सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

हेही वाचा - नाशकात तिघा भावंडांना विषबाधा; एकाचा मृत्यू

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा मंदिर परिसरात तैनात राहणार आहे. महिलांसाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींचे निर्भया पथक गर्दीच्या वेळी मंदिरात उपस्थित राहणार आहे.
रविवारी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून मंदिरात घटस्थापना केली जाईल. यावेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थित महापूजा होणार आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी दिली.

Intro:नाशिकच्या श्री कालिका देवी मंदिरात नवरात्री उत्सवासाठीची तयारी अंतिम टप्यात...

Body:नाशिकचे ग्राम दैवत असलेलं श्री कालिका देवी मंदिरात
नवरात्री उत्सवासाठीची तयारी अंतिम टप्यात आली असून,नवरात्र काळात मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासोबत भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे....

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिराला तीनशे वर्षांची परंपरा आहे, दरवर्षी या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यासाठी मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे,यंदा धार्मिक कार्यक्रमा सोबतच भाविकांच्या सुरक्षेची मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात आली आहे,पावसाची शक्यता लक्षात घेता मंदिरातच्या येण्या जाण्याच्या मार्गावर वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला आहे, तसेच महिला ,पुरुषां सह कुटुंबासाठी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, सुरक्षेच्यादृष्टीने मंदिर परिसरात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून,मंदिर प्रशासनाच्या वतीने सुरक्षा 60 कर्मचारी नेमण्यात आले आहे,तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीचे निर्भया पथक देखील गर्दीच्या वेळी मंदिरात उपस्थित राहणार आहे..तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा देखील या मंदिर परिसरात तैनात राहणार आहे,
येणाऱ्या 29 तारखेला मंदिराच्या विश्वस्त मंडळा कडून मंदिरात घटस्थापना केली जाईल ह्यानंतर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थित महापूजा केली जाणार आहे..तसेच दर वर्षी प्रमाणे पुढील आठ दिवस काकड आरती,महाआरती,होम हवन,भजन कीर्तनाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी दिली...
वन टू वन
केशव अण्णा पाटील अध्यक्ष श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.