ETV Bharat / state

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी संपत सकाळे बिनविरोध - शिवाजी चुंबळे नाशिक

नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर संपत सकाळे यांची बिनविरोध निवड झाली. मुख्य बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
संपत सकाळे सभापती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Mar 11, 2020, 2:07 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर आगामी काळासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्य बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी संपत सकाळेंची बिनविरोध निवड

हेही वाचा... कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यात आवश्यक त्या उपाययोजना - मुख्य सचिव

बाजार समितीत गैरव्यवहार, मनमानी कारभार, कर्मचाऱ्यांकडून लाच घेणे, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिवाजी चुंबळे यांच्यावर अन्य सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. 15 सदस्यांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून शिवाजी चुंबळे यांना विरोध दर्शवला होता. बाजार समितीत एकूण अठरा सदस्य आहेत. त्यापैकी 16 सदस्य उपस्थित होते. यावेळी शिवाजी चुंबळे गैरहजर राहिले, तर लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्या देविदास पिंगळे यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही.

शिवाजी चुंबळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर आज (मंगळवार) निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यात संपत सकाळे यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैर कारभाराला आळा घालणे, कर्मचाऱ्यांना समानाची वागणूक देणे, त्यांचे थकीत पगार याबाबत सकारात्मक निर्णय घेणे, आदी विषयांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सभापती नवनिर्वाचित संपत सकाळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... आयपीएलचे भवितव्य 'ठाकरे' सरकारच्या हाती; बुधवारी होणार कॅबिनेट बैठक

संपत सकाळेंच्या समर्थकांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

नाशिक शहरात रंगपंचमी होईपर्यंत नाशिक पोलिसांनी कलम 144 जमावबंदी लागू केली आहे. मात्र, या निवडणुकीत पोलिसांचे आदेश बाजूला ठेऊन संपत सकाळे समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फटाके फोडून गुलाळाची उधळण केली. यावेळी पोलिसांनी कारवाई करत दोन समर्थकांना ताब्यात घेतले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.