ETV Bharat / state

Nashik Accident News : भीषण अपघात; गणपती घेण्यासाठी आलेल्या कारने अनेकांना उडवले - नांदगाव रोडवर अपघात

Nashik Accident News : नाशिकच्या नांदगाव रोडवर गणपती घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना कारने उडवले आहे. नांदगाव रोडवरील गणेश मूर्ती विक्री केंद्रावर समोर हा भीषण अपघात (Accident On Manmad Nandgaon Road) घडला आहे.या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Manmad Road Accident News
नागरिकांना कारने उडवले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 12:02 PM IST

नांदगाव रोडवर अपघात

नाशिक : Nashik Accident News : मनमाड येथील नांदगाव रोडवर गणपती घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना एका भरधाव कारने उडवल्याने 3 वर्षीय मुलीसह 5 ते 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Accident On Manmad Nandgaon Road) या घटनेत अनेक मोटारसायकल, रिक्षा यासह इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात (Manmad City Police Station) बेजबाबदारपणे वाहन चालवणेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान : नाशिकच्या मनमाडमध्ये सुसाट कारने दिलेल्या धडकेत गणेशमूर्ती घेण्यासाठी आलेल्या 3 वर्षाच्या चिमुकलीसह 5 ते 6 गणेश भक्त जखमी झाले आहेत. तर रिक्षासह 4 ते 5 दुचाकींचेही नुकसान झाले आहे. नांदगाव रोडवरील गणेश मूर्ती विक्री केंद्रावर समोर हा भीषण अपघात झाला. कार चालक नांदगावचा असून गणेश मूर्ती घेऊन नांदगावकडे जात असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जखमींवर मनमाड व मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

थोडक्यात बचावले अनेकजण : मनमाड ते नांदगाव हा महामार्ग आता चौपदरीकरण करण्यात आला आहे. यामुळे या महामार्गवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. यामुळे वाहनाचा वेगही जास्त असतो.

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात Nashik Chandwad Accident : याआधी ही नाशिकच्या चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रासमोर कार-कंटेनरचा भीषण अपघात (Car Container Accident) झाला होता. यामध्ये कारमधील चार जण जागीच ठार झाले होते. कारमधील मृत युवक हे धुळे जिल्ह्यातील होते. ते सर्वजण नाशिककडून धुळ्याकडे चालले होते.

हेही वाचा -

  1. Punjab Accident: भरधावातील बस लोखंडी अँगलला धडकून कालव्यात कोसळली, ८ प्रवाशांचा मृत्यू
  2. Gas Cylinders Truck Accident : गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक उलटला, स्फोटाच्या आवाजानं हादरलं गाव
  3. Thane Lift Accident : ठाणे लिफ्ट अपघात प्रकरणात लिफ्ट ठेकेदारावर गुन्हा दाखल, बिल्डरवर कधी होणार गुन्हा दाखल?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.