ETV Bharat / state

कोट्यवधींच्या खर्चातून बांधलेल्या नामपूर ग्रामीण रुग्णालयात आरोग्याचे तीनतेरा - वैद्यकीय अधिकारी

नामपूर तालुक्यातील बागलाणच्या ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची सेवा चांगली आहे, मात्र त्यांच्याच आरोग्याबाबत आरोग्य विभागाला काहीही सोयरसुतक नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझर अशा कोरोनापासून संरक्षण देणाऱ्या सुविधा येथे उपलब्ध नाहीत.

Nampur Rural Hospital
नामपूर ग्रामीण रुग्णालय
author img

By

Published : Apr 12, 2020, 7:45 AM IST

नाशिक(सटाणा) - कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या नामपूर येथील ग्रामीण रुग्णालय सध्या रामभरोसे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझर अशा कोरोनापासून संरक्षण देणाऱ्या सुविधा येथे उपलब्ध नाहीत. पुरेसा औषधसाठा नसल्याने मोसम खोऱ्यातील रुग्णांचे हाल होत आहे. यामुळे रुग्णालयात तातडीने सुविधा द्याव्यात, अशी मागणी मोसम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे केली.

रुग्णालयाची वास्तू बनली शोभेची बाहुली

नामपूर तालुक्यातील बागलाणच्या ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची सेवा चांगली आहे, मात्र त्यांच्याच आरोग्याबाबत आरोग्य विभागाला काहीही सोयरसुतक नाही. दर महिन्याला तीन ते चार हजार रुग्णांची येथे तपासणी होते. आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांना आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध होत नसल्याने हे रुग्णालय शोभेची बाहुली बनले आहे. या रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 25 पदे मंजूर असून, अनेक रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक पद रिक्त आहे. औषधनिर्मात्याची शस्त्रक्रिया झाल्याने अन्य कर्मचाऱ्यांना त्यांचे अतिरिक्त काम पाहावे लागत आहे. आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी मिळत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी

कर्मचारी मिळत नसल्याने रुग्ण कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, शिपाई, सफाईदार, डोळे तपासणीस अशी पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरावीत, अशी मागणी मोसम प्रतिष्ठानचे गणेश खरोटे, राजू पंचाळ, नारायण सावंत, माजी सरपंच कविता सावंत, कमलाकर सोनवणे, सुरेश कंकरेज, तारीक शेख, उमेश दहीदे, किशोर खैरनार आदींनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.