ETV Bharat / state

हेल्मेट सक्ती कारवाई बेतली जीवावर, पोलिसाने काठी फेकून मारल्याने तरुण गंभीर - काठी फेकून मारल्याने तरुण गंभीर

पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू असताना, कारवाईच्या भीतीने पळ काढणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसानी काठी फेकून मारल्याने शुभम महाले हा युवक गंभीर जखमी झाला

हेल्मट सक्ती बेतली जीवावर, पोलिसाने काठी फेकून मारल्याने तरुण गंभीर
author img

By

Published : May 27, 2019, 12:12 PM IST

Updated : May 27, 2019, 12:25 PM IST

नाशिक - शहरात पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू असताना, कारवाईच्या भीतीने पळ काढणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसानी काठी फेकून मारल्याने शुभम महाले हा युवक गंभीर जखमी झालाआहे. पोलीस आमची तक्रार दाखल करून घेत नसल्याचे शुभमच्या आईने सांगितले.

हेल्मट सक्ती बेतली जीवावर, पोलिसाने काठी फेकून मारल्याने तरुण गंभीर

नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरात हेल्मेट सक्ती मोहीम राबवली. या दरम्यान हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई करत लाखों रुपयांचा दंड वसूल केला, मात्र हीच कारवाई एका युवकाच्या जीवावर बेतली आहे. नाशिकरोड भागात राहणारा शुभम महाले आणि त्याचा भाऊ ओमकार महाले हे संगमनेरहून दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने येत होते. यावेळी सिन्नर फाटा भागात पोलिसांकडून हेल्मेट सक्ती मोहीम सुरू होती. हेल्मेट नसल्याने आपल्यावर करवाई होईल या भीतीने ओमकार महाले याने गाडी वळवून पळण्याचा प्रयत्न केला. अशात एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या दिशेने काठी फेकून मारली. ही काठी गाडीवर मागे बसलेल्या शुभमच्या डोक्यात लागली आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.

त्यानंतर ओमकारने शुभमला सांभाळत त्याला घरी घेऊन गेला. घडलेला प्रकार आईला सांगितला, मात्र शुभमची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुभमची आर्थिक परिस्थिती खराब आहे. त्याला रुग्णालयात भरण्यासाठी 20 हजार रुपये नसल्याने त्याला उपचारासाठी मराठा समाजाच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दोन दिवस उलटूनही अद्याप शुभम शुद्धीवर आला नाही. या घटनेची तक्रार देण्यासाठी शुभमचे कुटुंब नाशिकरोड पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांकडून अशी कुठलीही घटना घडली नसून तुम्ही इथून निघून जा, नाहीतर तुमच्या मुलावर चोरीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देऊन शुभमच्या नातेवाईकांना तेथून काढून दिल्याचे शुभमची आई पुजा महाले यांनी सांगितले.

या घटनेची शहरभर चर्चा होऊनसुद्धा अद्याप त्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील याबाबत आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:"त्या"पोलीसांनी मुलांच्या डोक्यात काठी मारल्याने मुलगा अत्यवस्थ.. आईचा आक्रोश

Body:नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे..पोलिसांन कडून हेल्मेट सक्तीच कारवाई सुरू असतांना,कारवाईच्या भीतीने पळ काढणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसानी काठी फेकून मारल्याने शुभम महाले हा युवक गंभीर जखमी झाल्याचा आरोप शुभमच्या आई ने केला आहे.. मात्र पोलीस आमची तक्रार दाखल करून घेत नसल्याचे ह्या मातेचे म्हणणे आहे..

नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ह्यांनी शहरात हेल्मेट सक्ती मोहीम राबवली ह्या दरम्यान हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई करत लाखों रुपयांचा दंड वसूल केला, मात्र ह्याच दरम्यान हीच कारवाई एका युवकांच्या जीवावर बीतली आहे..नाशिकरोड भागात राहणार शुभम महाले आणि त्याचा भाऊ ओमकार महाले हे संगमनेर हुन दुचाकीवरून नाशिक च्या दिशेने येत असतांना सिन्नर फाटा भागात पोलीसांन कडून हेल्मेट सक्ती मोहीम सुरू होती,हेल्मेट नसल्याने आपल्यावर करवाई होईल ह्या भीतीने ओमकार महाले ह्याने गाडी वळून पाळण्याचा प्रयत्न केला अशात एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या दिशेने काठी फेकून मारली, ही काठी गाडीवर मागे बसलेल्या शुभमच्या डोक्यात लागली आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला,असं असतांना ओमकार ह्याने शुभम ला संभाळत त्याला घरी घेऊन गेला,घडलेला प्रकार आई ला सांगितला मात्र ह्या दरम्यान शुभमची प्रकृती बिघडल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं,मात्र शुभमची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये भरण्यास 20 हजार रुपये नसल्याने त्याला,त्याला उपचारासाठी मराठा समाजाच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं..मात्र दोन दिवस उलटूनही अद्याप शुभम शुध्दीवर आलं नाहीय..ह्या घटनेची तक्रार देण्यासाठी शुभम चे कुटुंब नाशिकरोड पोलीस ठाण्यात गेले असतांना,पोलिसांन कडून असा कुठला प्रकारचं घडला नसून तुम्ही इथून निघून जा नाहीतर तुमच्या मुलावर चोरीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन शुभमच्या नातेवाइकांना तेथून काढून दिल्याचे शुभम ची आई पुजा महाले ह्यांनी म्हटलं आहे...

ह्या घटनेची शहरभर चर्चा होऊन सुद्धा अद्याप त्या पोलीस कर्मचाऱ्यां विरोधात कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ह्या बाबत आता काय भूमीका घेतात ह्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

टीप फीड ftp
nsk police marhan viu 1
nsk police marhan viu 2
nsk police marhan viu 3
nsk police marhan byte 1
nsk police marhan byte 2

Conclusion:
Last Updated : May 27, 2019, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.