नाशिक - जेवढा हिंदू समाजाला अभिमान आहे. तेवढाच मुस्लीम समाजालाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान असल्याचे म्हणत नाशिकमध्ये मुस्लीम समाजाकडून सामाजिक एकतेचा संदेश दिला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लीम समाजाचे शत्रू नव्हते, तर ते अन्यायाचे, अत्याचार प्रवृत्तीचे शत्रू होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फौजेत अनेक निष्ठावंत मुस्लीम सरदार होते. हा संदेश देण्यासाठी नाशिक मध्ये राहत फाऊंडेशच्या वतीने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही समाजकंटक छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लीम समाजाचे शत्रू होते, अशा चुकीचा प्रचार करत असून यामुळे भविष्यात दोन समाजात दुरावा वाढू शकतो. तो दुरावा निर्माण होऊ नये यासाठी मुस्लीम समाजाकडून प्रयत्न केला जात आहे. राहत फाऊंडेशच्या वतीने शिवजंयती साजरी करताना मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांना गुलाब पुष्प तसेच शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम मावळ्यांची माहिती असलेले पत्रक दिले जात आहे.
हेही वाचा - मालेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात सुरू