ETV Bharat / state

'मी धर्मनिरपेक्ष मुस्लिम' सांगत तरुणीची मुंबई ते अयोध्या पदयात्रा, पाहा व्हिडिओ - ayodhya ram mandir news

Muslim Girl going Ayodhya : सध्या देशभरात राम मंदिरच्या उद्धाटनानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. अशातच मुंबईतील एक मुस्लिम तरुणी पायी अयोध्येला निघालीय. या तरुणीची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.

Muslim Girl to Ayodhya
Muslim Girl to Ayodhya
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 8:04 AM IST

मुस्लिम तरुणीची पायी अयोध्या वारी

नाशिक Muslim Girl going Ayodhya : अयोध्येत रामाच्या दर्शनाला मुंबईहून पायी निघालेली मुस्लिम मुलगी नाशिकला आली होती. नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेत तिनं आपल्या पुढील प्रवासाला सुरवात केली. मी प्रथमच अशा प्रकारे पायी यात्रेला चालत असल्यानं अयोध्याला पोहोचायला किती वेळ लागेल हे मला माहित नाही. पण त्यांच्या दर्शनाची आस मनात घेऊन मी निघाल्याचं तीनं सांगितलंय. शबनम शेख असं या तरुणीचं नाव आहे.

मी सनातनी मुस्लिम : पाठीवर केवळ एक बॅग, त्यावर जय श्रीराम, मुंबई ते अयोध्या पदयात्रा असं लिहिलेला फलक त्यावर भगवा झेंडा फडकवत एक मुस्लिम मुलगी आयोध्येला निघालीय. मी सनातनी मुस्लिम असल्याचं सांगत तिनं प्रभू रामाच्या दर्शनाची आस मनात ठेऊन मुंबई ते अयोध्या प्रवास सुरू केलाय. रामाच्याच कृपेनं ध्येय साध्य होईल असा विश्वास असल्याचं अयोध्येला निघालेल्या शबनम शेख हिनं सांगितलं.

थेट अयोध्यापर्यंत जाण्याचा निर्धार- देशभरात सध्या 22 जानेवारीला आयोजित होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा आहे. अयोध्येतील राम मंदिराबरोबरच देशातील अन्य सर्व राज्यांच्या प्रमुख शहरातील महत्त्वाच्या मंदिरांमध्येदेखील विविध उपक्रम होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईहून पायी निघालेली शबनमनं थेट अयोध्येपर्यंत जाण्याचा निर्धार केला. मुंबईहून निघालेल्या शबनमनं नाशिकच्या पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शन घेत मुंबई महामार्गच्या दिशेने रवाना झाली. यावेळी मुस्लिम मुलगी मंदिरात दर्शनाला आल्यानं तिला बघण्यासाठी गर्दी झाली होती.

मी एक सनातनी मुस्लिम प्रौढ मुसलमान मुलगी आहे. मी कट्टरवादी विचारधारणेची नव्हे, तर धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) मुस्लिम आहे. देशातील प्रत्येक सेक्युलर मुस्लिम हा सनातन आणि मुस्लिम आहे- शबनम शेख

सेक्युलर मुस्लिम : मी मुंबईच्या नालासोपारा इथून पायी चालत निघाली असून अयोध्याच्या मंदिरात पोहोचून दर्शन घेणार आहे. लहानपणापासूनच मी प्रभू राम यांच्याबाबत टीव्ही तसंच मोठ्या पडद्यावर पाहिलंय. तसचं ऐकलं आहे. तसंच त्यांच्याबद्दल वाचन केल्यानं माझ्या मनात आस्था निर्माण झालीय. त्यामुळं श्रद्धेपोटी अयोध्येला चालले असल्याचे शबनम शेख हिनं सांगितलं. मी अयोध्यातील मंदिराच्या उद्घाटनापर्यंत तिथं पोहोचू शकणार नाही, हे दखील मला माहित आहे. पण उद्घाटनानंतर काही दिवसांनी का होईना मला दर्शन मिळेल, अशी अपेक्षा असल्याचं शबनम हिनं सागितलं.

  1. देवाच्या दारात जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
  2. यासाठी उद्धव ठाकरेंना दिलं नाही राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण; गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.