दिंडोरी (नाशिक )-दिंडोरी येथील शासकीय गोडाऊनच्या कामांवर असलेले कामगार अडकून पडले होते. मात्र, या परप्रांतीय कामगारांना ठेकेदाराने दोन महिन्यांपासून पगार दिला नाही, रेशनही नाही त्यामुळे ऊपसमार होत असल्याने बायको पोरांसह ३० ते ४० कामगार आपले साहित्य डोक्यावर घेऊन आपल्या मुळ गावी निघाले आहेत. ते भर ऊन्हात पायपीट करत मध्यप्रदेशकडे जात आहेत.
लॉकडाऊन काळात ज्यांच्याकडे कामगार कामावर आहे त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी किंवा त्यांना पगार द्यावा, अशा सुचना शासनाने दिलेल्या असतानाही या कामगारांना पगाराचे पैसे मिळाले नसल्याने अखेर ह्या कामगारांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे.
राज्यासह देशात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अनेक ठिकाणी परराज्यातील कामगार अडकून पडले आहेत.