ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीत नाशकात घडणार नवा इतिहास ?

यंदाच्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदार संघात इतिहास घडवणार... विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना विश्वास.... म्हणाले एकदा निवडून आलेला खासदार सलग दुसऱ्या खासदार होत नसल्याचा इतिहास मोडीत काढणार

खासदार हेमंत गोडसे
author img

By

Published : Apr 1, 2019, 10:07 AM IST

नाशिक - लोकसभा निवडणुकीत यंदा समीर भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे असा थेट सामना बघायला मिळत आहे. या निवडणुकीत युतीचे खासदार हेमंत गोडसे यांचे पारड जड असले तरी एकाच गोष्टीची चिंता सध्या गोडसेंना सतावत आहे. ती म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या आतापर्यंतच्या इतिहासाची, नेमका काय आहे या मतदार संघाचा इतिहास याबाबतचा विशेष आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने... पाहुयात हा एक विशेष वृत्तांत...

खासदार हेमंत गोडसे

राजकीय विश्र्लेषक संपत देवगिरी हे सांगतात की, नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ६ विधानसभा मतदारसंघानी तयार झालेला आहे ग्रामीण आणि शहरी भागाच्या समावेश असलेला लोकसभेचा हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या विभिन्न आहे. यंदा या मतदारसंघातील सामना हा युती विरुद्ध आघाडी असा असला तरी भुजबळ विरुद्ध गोडसे असा थेट सामना म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

विद्यमान खासदार हेमंत गोडसे गेल्या निवडणुकीत थेट छगन भुजबळ यांना पराभूत करून जायंटकिलर ठरले होते. पाच वर्षात केलेले विकास कामे, दांडगा जनसंपर्क आणि भाजप युतीचे बुथ पातळीवरचे नियोजन या भरोशावर गोडसे पुन्हा खासदार होण्यासाठी कंबर कसत आहेत. मात्र, या सगळ्यात त्यांच्या मनात नाशिकच्या खासदारकीच्या इतिहासाची भीती निर्माण झाली आहे. कारण, १९५२ पासूनल ते २०१४ पर्यंतच्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाचा मागोवा घेतला असता हे दिसून येते की, १९७२ चा अपवाद वगळता एकही खासदार सलग दुसऱ्यांदा निवडून आला नाही. हा इतिहास पाहता, हेमंत गोडसेंना ही तीच चिंता सतावते की सलग दुसऱ्यांदानाशिकचा गड राखण्यात त्यांना यश मिळणार का? की इतिहासाची पुनरावृत्ती होणार याचीच.

देवगिरी म्हणाले, नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतच्या इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की १९५२ पासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये गो. ह. देशपांडे यांच्या सारखे लोकप्रतिनिधी दोनदा खासदार म्हणून निवडून आले. मात्र सलग नाही. त्यानंतर कवडे यांनी एकदाच सलग खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला तो १९७२ मध्ये. मात्र, त्यानंतर जवळपास ४७ वर्षांत एकही खासदार सलग दोन वेळा निवडून आलेला नाही.

आतापर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघातू निवडून आलेले खासदार

  1. १९५२ गो.ह. देशपांडे - काँग्रेस
  2. १९५७ दादासाहेब गायकवाड -पब्लिक सोशलिस्ट पार्टी
  3. १९६२ गो.ह. देशपांडे - काँग्रेस
  4. १९६७ अण्णासाहेब कवडे -काँग्रेस
  5. १९७२ अण्णासाहेब कवडे -काँग्रेस
  6. १९७७ विठ्ठलराव हांडे - शेतकरी कामगार पक्ष
  7. १९८० प्रतापराव वाघ - काँग्रेस
  8. १९८४ मुरलीधर माने - काँग्रेस
  9. १९८९ डी एस आहेर - भाजप
  10. १९९१ वसंतराव पवार - काँग्रेस
  11. १९९६ राजाभाऊ गोडसे - शिवसेना
  12. १९९८ माधवराव पाटील - राष्ट्रवादी
  13. १९९९ उत्तमराव ढिकले -शिवसेना
  14. २००४ देविदास पिंगळे - राष्ट्रवादी
  15. २००९ समीर भुजबळ - राष्ट्रवादी
  16. २०१४ हेमंत गोडसे - शिवसेना

असा इतिहास पाहून पाटलांना चिंता आहे. मात्र,यंदा देशात मोदी सरकारने केलेली कामं नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात केलेला विकास आणि सर्वसामान्य नाशिककरांना आपल्यावर असलेला विश्वास, यामुळे या निवडणुकीत इतिहास घडणार असल्याचा दावा हेमंत गोडसे करत आहेत.

नाशिक मतदार संघाच्या इतिहासावरून समीर भुजबळ यांना विचारणा केली असता, त्यांनी मात्र याबाबत फार काही राजकीय प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. तर आमचा विश्वास आम्ही केलेल्या कामांवर आणि शहरात झालेल्या विकासावर असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

Intro:नाशिक लोकसभा निवडणुकीत यंदा समीर भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे असा थेट सामना बघायला मिळतो आहे युतीचे खासदार हेमंत गोडसे यांचा या निवडणुकीत यांचं पारडं जड असलं तरी एकाच गोष्टीची चिंता सध्या गोडसेंना आहे आणि ती म्हणजे नाशिक लोकसभा मतदार संघात आत्तापर्यंत इतिहासाची काय आहे नेमका तो इतिहास पाहुयात हा एक विशेष वृत्तांत...

Body:संपत देवगिरी राजकिय विश्र्लेषक याच्या मंते:- नाशिक लोकसभा मतदार संघ हा सहा विधानसभा मतदार संघानी तयार झालेला आहे ग्रामीण आणि शहरी भागाच्या समावेश असलेला हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या अवघड असला तरी यंदा मात्र या मतदार संघात युती विरुद्ध आघाडी आणि त्यापेक्षा भुजबळ विरुद्ध गोडसे असा थेट सामना रंगणार आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे गेल्या निवडणुकीत थेट छगन भुजबळ यांना पराभूत करून जॉईन किलर ठरले होते पाच वर्षात केलेले विकास काम दांडगा जनसंपर्क आणि भाजप युतीच बुत पातळीवरचं नियोजन या भरोशावर गोडसे पुन्हा खासदार होण्यासाठी कंबर कसत आहेत मात्र या सगळ्यात त्यांच्या मनात असलेली एक भिती म्हणजे नाशिकच्या खासदारकीचा इतिहास 1952 पासून 2014 पर्यंत नाशिक लोकसभा मतदार संघात 1972 चा अपवाद वगळता तर एकही निवडणून आलेल्या खासदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही असा नाशिक लोकसभा मतदार संघाचा इतिहास आहे

Conclusion:नाशिक लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की 1952 पासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये गो-हे देशपांडे सारखे लोक प्रतिनिधी दोनदा खासदार म्हणून निवडून आले मात्र सलग नाही त्यानंतर कवडे यांनी एकदाच सलग खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला मात्र त्यानंतर जवळपास 47 वर्षांत एकदाही खासदार सलग निवडून आलेला नाही 1952 गो.ह. देशपांडे :-काँग्रेस 1957 दादासाहेब गायकवाड :-पब्लिक सोशलिस्ट पार्टी 1962 गो.ह. देशपांडे :-काँग्रेस 1962 यशवंतराव चव्हाण :-काँग्रेस बिनविरोध 1967 अण्णासाहेब कवडे :-काँग्रेस 19 72 अण्णासाहेब कवडे :-काँग्रेस 1977 विठ्ठलराव हांडे :-शेतकरी कामगार पक्ष 1980 प्रतापराव वाघ :-काँग्रेस 1984 मुरलीधर माने -काँग्रेस 1989 डी एस आहेर :-भाजप 1991 वसंतराव पवार -काँग्रेस 1996 राजाभाऊ गोडसे -शिवसेना 1998 माधवराव पाटील :-राष्ट्रवादी 1999 उत्तमराव ढिकले -शिवसेना 2004 देविदास पिंगळे:- राष्ट्रवादी 2009 समीर भुजबळ -राष्ट्रवादी 2014 हेमंत गोडसे -शिवसेना हेमंत गोडसे:-असं असलं तरी यंदा मात्र देशात मोदी सरकारने केलेली काम नाशिक लोकसभा मतदार संघात कधी झालं नाही एवढं भरघोस काम आणि सर्वसामान्य नाशिककरांना आपल्यावर असलेला विश्वास यामुळे इतिहास घडणार असा दावा हेमंत गोडसे करत आहे छगन भुजबळ:- दुसरीकडे समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी मात्र याबाबत फार काही राजकीय प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही आमचा विश्वास आम्ही केलेल्या कामांवर आणि शहरात झालेल्या विकासावर आहे अस छगन भुजबळ यांनी म्हटलंय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.