नाशिक - येवल्यातील दुचाकी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेली टोळी दुचाकी चोरल्यानंतर त्याला बनावट नंबर प्लेट लावून खेडोपाड्यांमध्ये कमी किंमतीला विक्री करत असत. या बाबत नाशिक ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली असता, सापळा रचत या टोळीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान दुचाकी चोरीची कबुली या चोरट्यांनी दिली आहे.
संशयित इसमाकडून गावठी कट्टा जप्त -
येवला शहर परिसरात येवला-नांदगाव रोडवर १ संशयित व्यक्ती अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत असल्याची पोलिसांना मिळताच या इसमाविरूद्ध विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा- छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ला, जखमी मराठी असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव हुतात्मा