नाशिक - दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्याजवळ झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार झाला आहे. ठार झालेल्या व्यक्तीचे नाव बापू मनोहर गरुड (वय ३९) असे आहे.
एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार झाला आहे. बापू मनोहर गरुड हे वरखेडा येथे सलूनमध्ये काम करत होते. संबधीत माहिती दिंडोरी पोलिसांनी दिली आहे.
अज्ञात वाहनाचा शोध जारी असून दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार तुळशिराम जाधव व पोलीस हवलदार यशवंत भोये पुढील तपास करत आहेत.