ETV Bharat / state

Death Due To Electric Shock: 'धोंड्या'साठी माहेरी आलेल्या मुलीचा आईसह विजेच्या धक्क्याने मृत्यू - धोंड्याचा महिना

अधिक मास सुरू असल्यामुळे लेक जावयांचे सध्या सासुरवाडीकडे येणे-जाणे वाढले आहे. परंतु या आनंदाच्या वातावरणात नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 'धोंड्या'साठी माहेरी आलेल्या मुलीचा आईसह विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

Death due to electric shock
विजेच्या धक्क्याने मृत्यू
author img

By

Published : Aug 7, 2023, 12:23 PM IST

विजेच्या धक्क्याने मायलेकीचा मृत्यू

नाशिक : सगळीकडे 'धोंड्या'ची लगबग सुरू आहे. नाशिकमधील ओझर येथे धोंड्यासाठी आलेली मुलगी आपल्या आईसोबत पेरू तोडायला घराच्या गच्चीवर गेली होती. तेथे वीज वाहिनीला लोखंडी रॉडचा स्पर्श झाल्यामुळे तिचा आणि तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घराकडे येणाऱ्या भावाचाही अपघात झाला. तोही अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजेच्या धक्क्याने मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी आकांक्षा रणशूर ही धोंड्यासाठी पती व दोन लहान मुलांसह ओझर येथे माहेरी आली होती. यावेळी ती व तिची आई मीना सोनवणे या दोघी गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्या लोखंडी रॉडने पेरू तोडत असताना बाजूने जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीला लोखंडी रॉडचा स्पर्श झाला. त्यामुळे आकांक्षा गच्चीवरील पाण्याच्या फायबरच्या टाकीवर फेकली गेली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी टाकी फुटून पाण्यातही करंट उतरला. काही कळायच्या आता तिच्या आईचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्यामुळे परिस्थिती गंभीर : आरडाओरड झाल्याने आकांक्षाचे पती दोन लहान मुलांसह गच्चीवर पळत आले. वीज प्रवाह पाण्यात उतरलेला असल्यामुळे त्यांना त्या पाण्याने जोराने बाजूला फेकले, त्यामुळे तिघांचा जीव वाचला. आकांक्षाला अडीच वर्षाची मुलगी व एक वर्षाचा मुलगा आहे. विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. परंतु आजूबाजूच्या नागरिकांनी वीज वितरण कंपनी व अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती कळविली. संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने हजर होत वीज प्रवाह खंडित केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

भाऊ अपघातात गंभीर जखमी : आकांक्षाचा भाऊ नाशिकमधील सिटी लिंक बसमध्ये कामाला आहे. या घटनेनंतर तो तातडीने ओझरला घरी येत होता. तेव्हा सिटी लिंकच्याच बसला त्याने धडक दिली. त्यामुळे डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा :

  1. Citizen death in CMs Event Thane: विजेचा शॉक लागूनही मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरुच राहिला...नागरिकाचा अखेर रुग्णालयात मृत्यू
  2. Nanded News: शेतातील विद्युत कुंपणाने केला घात; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
  3. गावाजवळच्या तळ्यात आंघोळीला गेले अन् शॉक लागला; एकाच परिवारातील चार चिमुकल्यांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.