नाशिक - जिल्ह्यात अनलॉक सुरु झाल्यानंतर कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यात सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात आढळून येत असल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. अशात 22 जूनला एकाच दिवशी जिल्ह्यात 108 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक 85 रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. तर, सोमवारी 10 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्मृयान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 2874 रुग्ण कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातील 1674 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आडगाव आजपासून बंद -
आडगावमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे, गावकऱ्यांनी 23 ते 30 जूनपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दवाखाने आणि मेडिकल वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
पंचवटी 31 जूनपर्यंत बंद -
नाशिकमधील पंचवटी हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. यात सर्वधिक रुग्ण फुलेनगर, हिरावाडी, टकले नगर या भागात आढळून आले आहेत. त्यामुळे, 23 ते 31 जूनपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
नाशिक जिल्ह्याची परिस्थिती
एकूण कोरोनाबाधित रुग्ण - 2874
कोरोनामुक्त रुग्ण - 1674
एकूण मृत्यू - 175
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -1025