ETV Bharat / state

MNS preparations for Lok Sabha : मनसेकडून लोकसभेची जोरदार तयारी, अमित ठाकरेंनी नाशिकच्या दौऱ्यात काय आखली रणनीती?

अमित ठाकरे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातील 35 गणेश मंडळांना भेटी देऊन आरती करणार आहेत. अमित ठाकरे यांनी नाशिकवर लक्ष केंद्रित केलं आहे.

MNS preparations for Lok Sabha
MNS preparations for Lok Sabha
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 5:31 PM IST

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकला ताब्यात घेण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी युवा नेते अमित ठाकरे हे 26 व 27 सप्टेंबरला नाशिकमध्ये येणार आहेत.

मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे नाशिकमध्ये दौरे सुरू झाले आहेत. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर पुन्हा मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी युवा नेते अमित ठाकरे झपाटून कामाला लागले आहेत. यासाठी ते सातत्याने नाशिक दौरा करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील महिन्यात नाशिक जिल्ह्यात महासंपर्क अभियान राबवण्यात आलं.

गणेश मंडळांना भेटी देणार- महासंपर्क अभियानामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याबरोबरच काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटीही त्यांनी घेतल्या आहेत. या कालावधीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक शहरातील चारही मतदारसंघ व सिन्नर तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. काही मंडळात ते आरती करणार आहेत. तर काही ठिकाणी देवदर्शन करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

मनसेचे निष्ठवंत सोडून गेले- 2009 च्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेचा बोलबाला होता. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तीन आमदार नाशिक शहरात निवडून आले होते. त्यात स्वर्गीय उत्तमराव ढिकले, वसंत गीते आणि नितीन भोसले यांचा समावेश होता. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे माजी आमदार वसंत गीते यांनी उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे. तर स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल ढिकले हे भाजपा पक्षातून नाशिक पूर्व मतदार संघात आमदार म्हणून काम करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी माजी आमदार नितीन भोसले यांनी मुबईत शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

याठिकाणी असणार कार्यक्रम- नाशिक शहरातील इंदिरानगर, नाशिक रोड, अबंडगाव, गंगापूर रोड, सिडको या भागातील 16 गणेश मंडळांना अमित ठाकरे मंगळवारी भेटी देणार आहेत. तसेच बुधवारी सातपूर, सिन्नर, देवळाली, मखमलाबाद, भगूर आणि पळसे या भागातील 19 गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. अमित यांच्या स्वागतासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. याच माध्यमातून ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे.

अमित ठाकरेंवर नाशिकची जबाबदारी- मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवली आहे. राज ठाकरे यांनी स्वतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ या भागाकडं लक्ष केंद्रित केलं आहे. नाशिकमध्ये अमित ठाकरे संघटनाबांधणीबरोबर शहरातील महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेत संपर्क वाढवित आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. मागील निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी सरकार विरोधात प्रचार केला होता.

हेही वाचा-

  1. MNS Lok Sabha Preparation: इंजिन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात.. अमित ठाकरेंसह मनसे नेत्यांच्या 'या' मतदारसंघात नियुक्त्या
  2. Amit Thackerays Padyatra : मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून अमित ठाकरेंची पदयात्रा सुरू, मनसेचे अनेक कार्यकर्ते सहभागी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.