नाशिक - आगामी विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार की नाही याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशात राज ठाकरे यांनी आता निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासंदर्भात आता मनसे पदाधिकारी देखील तयारीला लागले आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांनी नाशिकमध्ये येऊन जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची चर्चा करून मुलाखती घेतल्या आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण 15 जागा स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहेत. इच्छुक उमेदवारांचा अहवाल राज ठाकरे यांना पाठवला जाईल. त्यांनतर मनसेचे उमेदवार जाहीर केले जातील असे संदिप देशपांडे यांनी सांगितले
ठरलं.. 'मनसे' ही विधानसभेच्या रिंगणात, नाशिकमधील सर्व जागा लढवणार - election at nashik
विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार असल्याच मनसे नेत्यांनी सांगितले आहे.
नाशिक - आगामी विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार की नाही याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशात राज ठाकरे यांनी आता निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासंदर्भात आता मनसे पदाधिकारी देखील तयारीला लागले आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांनी नाशिकमध्ये येऊन जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची चर्चा करून मुलाखती घेतल्या आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण 15 जागा स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहेत. इच्छुक उमेदवारांचा अहवाल राज ठाकरे यांना पाठवला जाईल. त्यांनतर मनसेचे उमेदवार जाहीर केले जातील असे संदिप देशपांडे यांनी सांगितले
बाईट : संदीप देशपांडे ( प्रदेश सरचिटणीस मनसे)Conclusion:..