ETV Bharat / state

Raj Thackeray : राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना थेटच विचारले; तुम्ही मला मतदान करत नाही, मग अडचणीच्या वेळी...

राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान काही शेतकरी त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन आले. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या व या समस्यांबाबत त्यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून देईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Raj Thackeray farmer meeting
राज ठाकरे शेतकरी भेट
author img

By

Published : May 21, 2023, 4:19 PM IST

Updated : May 21, 2023, 4:40 PM IST

राज ठाकरे आणि शेतकऱ्यांची भेट

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात शेतकऱ्यांनी आज त्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. कर्ज भरण्यासाठी बँकेकडून दिलासा मिळण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर शेतकरी प्रतिनिधींसह आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊ, असे राज ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे? : यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'मध्यंतरी शेतकऱ्यांनी संप केला होता. तेव्हा काही शेतकरी मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितले की, अडचणीच्या काळात तुम्ही माझ्याकडे येता मात्र जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा दुसऱ्यांना मतदान करता. त्यावर शेतकरी मला म्हणाले की अडचण वेगळी आणि मतदान वेगळं. जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येता? जे म्हणाले होते की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू त्यांना तुम्ही मतदान केलं नाही. आपण काय करत आहोत याचं भान ठेवा', असे राज ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले.

'जर पुन्हा मला मतदान केले नाही तर..' : अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान तर दुसरीकडे बँकेची वसूली यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यातच मोठ्या थकबाकीदारांना जिल्हा बँक पाठीशी घालत आहे. बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकरी तयार आहेत, मात्र, बॅंकेने त्यासाठी आणखी वेळ देण्याची आमची मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी राज ठाकरेंना सांगितले. राज ठाकरेंसोबत बैठक संपल्यानंतर एका शेतकऱ्याने त्यांना चाबूक भेट दिला. यानंतर जर त्यांना मतदान केले तर यानेच मारेन, अशी मिश्कील टिप्पणी राज ठाकरेंनी केली.

शेतकरी समाधानी : राज ठाकरेंशी भेट झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेतकरी म्हणाले की, 'राज ठाकरेंनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही परत या, तुमच्या जमिनींचे जे प्रश्न आहेत त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं करुन देतो. तुम्हाला न्याय मिळेल यासाठी मी प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही आज समाधानी आहोत. राज ठाकरेंनी आमच्या जमिनीबाबतच्या समस्या जाणून घेतल्याचे आम्हाला समाधान आहे', असे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Raj Thackeray On Trimbakeshwar : 'कोणी मंदिरात आल्याने आपला धर्म बुडेल एवढा तो कमकुवत आहे का?'
  2. Raj Thackeray On Narendra Modi : हिंदू धर्म इतर धर्मीयांमुळे भ्रष्ट होणारा नाही, नोट बंदीची धरसोडवृत्ती चांगली नाही; राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
  3. Raj Thackeray Nashik Visit: संघटना मजबूत करण्यासाठी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Last Updated : May 21, 2023, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.