ETV Bharat / state

Raj Thackeray On Narendra Modi : हिंदू धर्म इतर धर्मीयांमुळे भ्रष्ट होणारा नाही, नोट बंदीची धरसोडवृत्ती चांगली नाही; राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

राज ठाकरे यांनी 2 हजार रुपयाच्या नोटबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या वादात बाहेरच्यांनी पडू नये, गावकरी निर्णय घेतील असेही स्पष्ट केले.

Raj Thackeray On Narendra Modi
राज ठाकरे
author img

By

Published : May 20, 2023, 10:27 AM IST

Updated : May 25, 2023, 2:27 PM IST

नाशिक : नोटबंदीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामारे जावे लागले. त्यामुळे नोटबंदी करणे आपल्याला परवडणारे नाही. नोटबंदीची धरसोडवृत्ती चांगली नसल्याची टीका राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. हिंदू धर्म हा इतर धर्मीयांमुळे भ्रष्ट होणारा नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमधील वादात बाहेरच्यांनी पडू नये असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. ते आज नाशिक येथे पत्रकारांसोबत बोलत होते.

त्र्यंबकेश्वर येथील वादात बाहेरच्यांनी पडू नये: सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये वाद सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. मात्र त्र्यंबकेश्वरमध्ये 100 वर्षाची परंपरा आहे, ती परंपरा मोडू नका. हिंदू धर्म इतर धर्मीयांमुळे भ्रष्ट होत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र गड किल्ल्यावर असलेले दर्गे, मशीदी हटवल्याच पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरेंनी घेतला भाजपचा समाचार : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सध्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील धूप प्रकरणावरुन वाद सुरू आहे. मात्र या प्रकरणात बाहेरच्यांनी पडू नये. हा निर्णय स्थानिक गावकऱ्यांचा असल्याने गावकऱ्यांनीच या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिंदू धर्म इतर धर्मीयांमुळे भ्रष्ट होत नाही : राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन राजकारण करणाऱ्यांना चांगलेच फटकारले. हिंदू धर्म हा इतर धर्मीयांच्यामुळे भ्रष्ट होणारा धर्म नाही. त्यामुळे इतर ठिकाणच्या नेत्यांनी या प्रकरणात पडू नये, असा इशाराच राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

  1. 2 thousand note ban : नागरिकांचे अर्थ गणित बिघडवणारी 2 हजारची गुलाबी नोट का झाली बंद, काय होता इतिहास
  2. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर
  3. Maharashtra Ministry Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील ?

Last Updated : May 25, 2023, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.