ETV Bharat / state

आमदार नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल', आंदोलनाचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा इशारा

आमदार झिरवळ यांचा फोन गेल्या ३ दिवसांपासून लागत नसल्यामुळे ते उद्यापर्यंत सापडले नाहीत, तर रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

आमदार नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल'
author img

By

Published : Nov 24, 2019, 3:42 PM IST

नाशिक - दिंडोरी पेठ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी सिताराम झिरवळ गेल्या ३ दिवसांपासून घरच्यांच्या संपर्कात नाहीत. यामुळे झिरवळ यांचा मुलगा गोकूळ यांनी वणी पोलीसांत तक्रार दाखल केली. मात्र, त्यांच्या फोनचे लोकेशन राजभवनात दिसत असल्याने मुंबईला तक्रार करण्याचा सल्ला वणी पोलिसांनी दिला आहे.

आमदार नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल'

याच कारणामुळे गोकूळ झिरवळ आणि दिपक झिरवळ हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन आम्ही तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार झिरवळ यांचा फोन गेल्या ३ दिवसांपासून लागत नसल्यामुळे ते उद्यापर्यंत सापडले नाहीत, तर रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी दिंडोरी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, मधुकर भरसट , विलास कड, दतु बाबा कावळे, रवी सोनवणे ,संतोष रेहेरे, धोंडीराम थैल, इंद्रा गांगुर्डे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Intro:नाशिक - दिंडोरी पेठ चे आमदार नरहरी झिरवाळ यांचा घरच्यांचा संपर्क होत नसल्यामुळे तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत
Body:दिंडोरी पेठ मतदार संघातील आमदार नरहरी सिताराम झिरवाळ हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार तिन दिवसापासून मुंबईला गेले असल्यामुळे त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे वणी पोलीस स्टेशन येथे गोकूळ नरहरी झिरवाळ माझे वडील आमदार नरहरी सिताराम झिरवाळ ह्यांचा फोन लागत नसल्यामुळे आमचे कुंटूंब चिंताग्रस्त आम्ही तक्रार देण्यासाठी वणी पोलीस स्टेशनला आल्यानंतर साहेबांचा मोबाईलचे लोकेशन राजभवनात दिसत असल्यामुळे तुम्ही मुंबईला तक्रार द्यावी अशी विनंती केल्यामुळे गोकूळ झिरवळ व दिपक झिरवाळ मुंबईच्या दिशेने निघाले असून लवकरच शरद पवार साहेब यांची भेट घेवून आम्ही तक्रार दाखल करणार असल्याचे सांगीतले
Conclusion:
गेल्या तिन दिवसा पासुन आमदार झिरवळ यांचा फोन लागत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दत्तू बाबा कावळे व अंबानेर ता दिंडोरी यांचे आमदार झिरवळ उदयापर्यत सापडले नाहीत तर आम्ही रस्ता रोखो करण्याचा इशारा दिला. या वेळी दिंडोरी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे , मधुकर भर सट , विलास कड , दतु बाबा कावळे, रवी सोनवणे ,संतोष रेहेरे , धोंडीराम थैल , इंद्रा गांगुर्डे , आदी राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.