नाशिक - कोरोनाचा प्रभाव थांबावा, यासाठी सर्व यंत्रणा मोठ्या ताकदीने प्रयत्न करत आहेत. मात्र, महसूल विभागातील कर्मचारी तसेच रूग्णांच्या सेवेसाठी राबणारे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत आहे. त्यामुळे या आणिबाणीच्या काम करणाऱ्यांचा तत्काळ विमा काढावा, यासाठी नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात आमदार फरांदे यांनी कोरोनाग्रस्तावंर उपचार करणारे तसेच कोरोनाचा फैलाव थांबावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या सर्वच विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी केली आहे. या शिवाय पुढील आठ दिवस शहरी भागातून ग्रामीण भागात होणारे नागरिकांचे स्थलांतर थांबवावे अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.
हेही वाचा - नाशकातील औद्योगिक संघटनांचा 'जनता कर्फ्यूला' पाठिंबा; तीन लाखांपेक्षा जास्त कामगारांना मिळणार सुट्टी