नाशिक - दुधामध्ये सोयाबीन तेल आणि रंगहीन द्रव्य मिसळून मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार अन्न व औषध विभागाने टाकलेल्या छाप्यात समोर आला आहे. सिन्नरच्या पाथरी गावातील स्वामी समर्थ दूध संकलन केंद्रात हा जीवघेणा प्रकार सुरू होता. याप्रकरणी अन्न व औषध विभागाच्या पथकाने केंद्र चालकासह इतर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नरच्या पाथरे गावातून समोर आला आहे. पाथरी याठिकाणी असलेला स्वामी समर्थ दूध संकलन केंद्रामध्ये दुधात सोयाबीन तेल आणि रंगहीन द्रव्य मिसळत मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळताच याठिकाणी छापा टाकत अन्न व औषध विभागाच्या पथकाने तीनशे वीस लिटर भेसळयुक्त दूध जप्त केल आहे. स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र चालक अक्षय गुंजाळ याने अधिकचा नफा कमावण्यासाठी दुधामध्ये पावडर सोयाबीन तेल आणि मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या पॅराफीन यांसारख्या हानिकारक पदार्थांची भेसळ केली असल्याची कबुली दिल्याचं देखील समोर आले. याप्रकरणी अक्षय गुंजाळ सह इतर चार जणांविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई वावी पोलीस आणि अन्न व औषध विभाकडून सुरू आहे.
![आरोपीला अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-rtu-milkadulteration-mh10018_21092021160325_2109f_1632220405_241.jpg)