नाशिक - आंतरधर्मीय लग्न सोहळ्यास पाठिंबा देणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाशिकच्या सुवर्णकार संघटनेने केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याबाबत पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
नाशिकमध्ये रसिका आडगावकर आणि असिफ शेख यांचा विवाह परिवाराने आयोजित केला होता. या लग्न सोहळ्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होताच, या विवाह लव्ह जिहादचे नाव देत या लग्नाला काही संघटनांनी विरोध दर्शविला. वाढता दवाब बघून मुलीच्या कुटुंबाने हे लग्न रद्द केले त्याबाबत त्यांनी सुवर्णकार संघटनेला तसे पत्रही दिली होते. मुलगी दिव्यांग असल्याने थेट राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुलीच्या घरी पोहचून लग्नाला विरोध करणाऱ्या संघटनेचा चांगलाच समाचार घेतला होता. तसेच तुम्ही लग्न लावा, कोण लग्न थांबवतो मी बघतो, असे म्हणत या लग्नाला पाठिंबा दर्शवला होता.
सुवर्णकार समाजाने काय म्हटले?
- बच्चू कडू यांनी नाशिक येथे संपूर्ण हिंदू सुवर्णकार समाजाबद्दल खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या निषेधार्ह वक्तव्यामुळे समाजाची बदनामी झाली
- बच्चू कडूंच्या वक्तव्यामुळे व्यतीथ होऊन समाजाचे ह.भ.प.सुनिल मधुकर माळचे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला
- राज्यमंत्री बच्चू कडू यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा तसेच त्यांनी मीडियासमोर जाहीर माफी मागावी व राज्यमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा
- आडगांवकर कुटुंबाकडून विवाहासंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकतर्फी माहिती घेतली
- रसिका हिला सोनार समाज स्विकारीत नसल्याने आडगावकर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे, हे धादांत खोटे आहे
- समाजाने रसिकासाठी वेळोवेळी चांगली स्थळे दाखविली होती. मात्र, आडगांवकर कुटुंबीयांनी सातत्याने सर्व स्थळांना नकार दिला
- रसिकासाठी दाखविलेल्या समाजातील तरुणांना आम्ही समोर आणण्यासदेखील तयार आहोत
- बच्चू कडू यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक होते. मात्र, निव्वळ प्रसिध्दीसाठी संपूर्ण हिंदू सोनार/सुवर्णकार समाजाला लक्ष्य कले
- नालायक, पाखंडी, अधर्मी, चांडाळ चौकडी, तिकडे जाऊन मरा ना, अशी भाषा राज्यमंत्र्यांना शोभणारी नाही
हेही वाचा - नाशिकचा आसिफ आणि रसिका, "लव जिहाद"च्या आरोपांनी मोडले लग्न, मंत्री बच्चू कडूंनी अशी घडवली समेट