नाशिक - राज्यात तिसर्या लाटेचा धोका बघता मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असले तरी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी (दि. 18 जुलै) गंगापूर रोड येथील नवश्या गणपतीचे दर्शन घेत आरती केली आहे. त्यामुळे नियम सर्वसामान्यांसाठीच का, असा सवाल भक्तांमधून उपस्थित केला जात आहे.
सर्वसामान्यांनासाठी मंदिर बंद तर मंत्र्यांना मंदिर खुले कसे झाले
राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड हे रविवारी (दि. 18 जुलै) अचानक नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी गंगापूर रोड येथील नवश्या गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांची देखील दुटप्पी भूमिका समोर आली आहे. मंत्री आव्हाड यांचा हा दौरा गोपनीय होता. त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला कोणतीही माहिती नव्हती. आव्हाड यांनी गणपतीचे दर्शन घेत आरतीही केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे त्र्यंबकेश्वर येथे एका खासगी कामासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान, राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे हे बंद ठेवली आहे. असे असताना ही मंत्री जितेंद्र आव्हाड हे आले व त्यांनी गंगापूर रोडवरील नवश्या गणपतीच्या मंदिरात जाऊन तिथे विधिवत पूजा केली. यावरुन मंदिर केवळ सर्वसामान्यांसाठीच बंद आणि मंत्र्यांसाठी खुले कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - राज ठाकरे आश्वासक चेहरा, पण परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी- चंद्रकांत पाटील