ETV Bharat / state

Jayant Patil Nashik : मराठी माणूस मराठी माणसांना मोठं करण्यात कमी पडतो - जलसंपदामंत्री जयंत पाटील

दक्षिणेकडील राज्यात कलावंतांना देवाप्रमाणे मानतात इतके की त्यांना मुख्यमंत्री करतात. मात्र, मराठी माणूस मराठी माणसांना मोठं करण्यात कमी पडतो अशी खंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच आयुष्यात निर्मळ मनाने केलेले कार्य यशास प्राप्त ठरते.

Minister Jayant Patil at Suvichar Award Distribution Nashik 2022
सुविचार पुरस्कार वितरण
author img

By

Published : Mar 6, 2022, 12:58 PM IST

नाशिक - दक्षिणेकडील राज्यात कलावंतांना देवाप्रमाणे मानतात इतके की त्यांना मुख्यमंत्री करतात. मात्र, मराठी माणूस मराठी माणसांना मोठं करण्यात कमी पडतो अशी खंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांनी व्यक्त केली. तसेच आयुष्यात निर्मळ मनाने केलेले कार्य यशास प्राप्त ठरते. कारकिर्दीत प्रामाणिकपणा आणि जिद्द यांची सांगड घातल्यास कोणतेही काम अवघड नाही, असे प्रतिपादनही जयंत पाटील यांनी केले. नाशिकमध्ये पार पडलेल्या सुविचार पुरस्कार ( Suvichar Award Distribution Nashik ) वितरण प्रसंगी ते बोलत होते.

दक्षिणेकडे अभिनेत्यांना मुख्यमंत्री करतात; मात्र,...

दिसण्यावर काहीच नसतं तर माणसाच्या असणं महत्वाचे आहे. व्यासपीठावरील मराठी कलाकारांचा गौरव करतांना त्यांनी सांगितले की, दक्षिणेकडे अभिनेत्यांना मुख्यमंत्री करतात. मात्र, आपण आपल्या माणसांना मोठ करण्यात कमी पडतो. आपण प्रेम, व्देष राखून करतो. खरेपणाने यश नक्कीच मिळतं, असे सांगत त्यांनी पुरस्कार्थींचे अभिनंदन केले.

जयंत पाटील म्हणतात केसावर फुगे...

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे भाषणासाठी उभे राहीले. भाषणाला सुरूवात करतांना त्यांनी अभिनेता सिध्दार्थ जाधव याचे कौतुक केले. तसेच जाधव यांनी आपण दिसायला फार चांगले नाही, असा उल्लेख केला. हा धागा पकडत आपण दिसायला चांगले नाहीत, असे कोण म्हणतो आपण जी हेअर स्टाईल केली आहे तिचे मला फार आकर्षण वाटते. आपल्या केसावर जो फुगा आला आहे त्याला मला हात लावूशी वाटतो, असे सांगताच सिध्दार्थ जाधवनेही आपल्या जागेवर उठून पाटील यांच्याकडे धाव घेतली. यावेळी सिध्दार्थच्या केसावरील फुग्याला जाधव यांनीहात लावताच सभागृहात एकच हशा पिकला. ( Jayant Patil & Siddharth Jadhav Nashik )

Minister Jayant Patil at Suvichar Award Distribution Nashik 2022
सुविचार पुरस्कार वितरण

भुजबळ म्हणतात बीएसएनएल वाचवा -

आपल्या खास शैलीत भाषण करतांना पालकमंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal Suvichar Award Distribution ) म्हणाले, नाशिकच्या नितीन महाजन यांनी नाशिक दूरसंचार देशात एक क्रमांकावर आणले आहे. मात्र, केंद्र सरकारने रेल्वे, विमान कंपनीचे खासगीकरण केले. अगदी अलीकडेच विमान कंपनीही गेली. त्यामुळे ते दूरसंचारही केव्हा विकतील, याचा नेम नाही असा टोला त्यांनी लगावला. अर्थात दिल्लीकरांची कृपादृष्टी असल्याशिवाय ते शक्य नाही ही भावना तिथपर्यंत पोहोचवा, असेही ते म्हणाले. तर दररोज गोदावरीत स्नान करणाऱ्या आयुक्तांना गोदा प्रदुषणमुक्त करण्यासाठी हातभार लावा अन रामकुंडात स्नान करा, असा टोलाही त्यांनी लगावला.

अविचार न करता सुविचार करा, असा संदेश देत ‘सुविचार मंच’ नाशिक ही सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारी संस्था असून लोकमनाच्या सुखदु:खात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार देण्याचे काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी काम करत आहे. आकाश पगार यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो विद्यार्थी युवक गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी ‘देव द्या देवपण घ्या’ हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम राबवित आहे. ही अतिशय गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - PM In Pune Today : 'गो बॅक मोदी' म्हणत काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

एकलव्याप्रमाणे काम करत राहा यश नक्की मिळते -

अभिनेता सिद्धार्थ जाधव सत्काराला उत्तर देतांना म्हणाला की, मनुष्याकडे जे नसते, त्याचा बाऊ न करता जे आहे, त्याकडे लक्ष दिले तर अधिक यश मिळते. या मोहमयी जगात आकर्षक काहीही शाश्वत नसते. तुमचा स्वभाव आणि दुसर्‍यास आदर देणारी वृत्ती हेच तुमचे सौंदर्य असते. आई वडिलांचे आशीर्वाद घेत एकलव्याप्रमाणे सातत्याने काम केल्यास नक्कीच यश मिळते.

नाशिककर असल्याचा अभिमान -

अभिनेता चिन्मय उदगीरकर याने आपण नाशिककर असल्याचा अभिमान आहे, असे सांगितले. तसेच कलाकार म्हणून काम करत असताना या शहरासाठी आपण काही तरी देणे लागतो, याकरीता नमामि गोदा उपक्रम राबवत असल्याचे सांगत नाशिकमध्ये चित्रनगरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नाशिककरांनी प्रेम दिले -

गेली १२ वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत असतांना आज नाशिककरांनी मला जे प्रेम दिल त्याची ॠणी असून सुविचार गौरव पुस्काराने जबाबदारी वाढली आहे. मला बळ मिळाल्याचे अभिनेत्री पुजा सावंत हिने सांगितले. यावेळी बोलतांना त्यांनी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास उलगडवून सांगतांना आपले अनुभव कथन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.