ETV Bharat / state

Dada Bhuse Video : मंत्री दादा भुसेंनी तरुणाच्या लगावली कानशिलात; कारवाईची जितेंद्र आव्हाडांची मागणी

अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar ) नंतर आता राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे ( Cabinet Minister Dada Bhuse ) हे वादात अडकण्याची शक्यता आहे. ( Dada Bhuse get involved in controversy ) मंत्री दादा भुसे हे तरुणांना फटकावत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ( NCP leader Jitendra Awad ) यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओ वरून आता मंत्री दादा भुसेवर कारवाईची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संशयिताच्या कानशिलात लावत त्यांना पोलिसांच्या हवाली केले. हा व्हिडीओ मालेगाव येथील असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.(Minister Dada Bhuse slap youth)

NCP leader Jitendra Awad
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Dec 27, 2022, 3:16 PM IST

मंत्री दादा भुसे यांनी दिला त्या युवकाला चोप

नाशिक ( मालेगाव ) : मालेगावत सुरु असलेल्या श्री पुण्य शिवपुराण सोहळ्यात ( Shree Punya Shivpuran ceremony ) चोर शिरले होते. गर्दीचा फायदा घेऊन त्यांनी अनेकांचे पॉकेट आणि मोबाईल चोरण्या सोबत सोहळ्यासाठी आलेल्या महिलांची छेड काढत होते. त्यांना पकडण्यात आल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Dada Bhuse ) यांनी त्यांचा चांगला समाचार घेत एका संशयिताच्या कानशिलात लावत त्यांना पोलिसांच्या हवाली केले. मात्र या दरम्यानचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. (Minister Dada Bhuse slap youth)

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट : बंदरे आणि खनिजकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचा दोन युवकांना शिवीगाळ मारहाण करतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awad ) यांनी पोस्ट केला आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी करणार ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar ) यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे सरकार अडचणीत सापडले आहे. भुसे यांचा युवकांना मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. यावरून कायदा सुव्यवस्थेचे काय ? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले आव्हाड : मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलिस घेणार पोलिसांसमोर मारले माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत, सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केली.

दादा भुसे हे वादात अडकण्याची शक्यता : अब्दुल सत्तार नंतर आता राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे हे वादात अडकण्याची शक्यता आहे. मंत्री दादा भुसे हे तरुणांना फटकावत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओ वरून आता मंत्री दादा भुसेवर कारवाईची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांचा एक व्हिडिओ ट्विट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न विचारले आहेत. माझ्याविरुद्ध खोटे षडयंत्र रचून माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आता मंत्री दादा भुसे युवकांना शिवीगाळ देतात, त्यांना फटकवतात तर आता काय कारवाई कराल असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ मालेगाव येथील असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

त्या व्हिडीओत नेमकं काय आहे ? जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला दादा भुसे यांचा व्हिडीओ हिरकणी कक्षातील आहे. या व्हिडीओमध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना काही प्रश्न विचारत आहे. हे दोन्ही तरुण मद्यपान केलेले दिसत आहे. दादा भुसे यांच्या बोलण्यातून, त्या दोन्ही तरुणाला रविवारी त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आज त्यांची सुटका झाली आहे. दादा भुसे त्यामधील एका व्यक्तीला मारहाण करत आहेत. त्याशिवाय त्यांना शिव्याही दिलेल्या व्हिडीओत दिसत आहे. त्या दोन्ही तरुणांची नेमकी चूक काय होती? कोणत्या कारणासाठी दादा भुसे मारहाण करत आहेत? हा व्हिडीओ कधीचा आहे? कुठला आहे? याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर येतेय? विरोधक याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार का? हे लवकरच समजेल.

दादा भुसेंच्या अडचणी वाढणार का ? एकनाथ शिंदे यांचे मंत्रीमंडळातील सहकारी अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांनी आधीच टीका करण्यास सुरुवात केली आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर गायरन जमीन घोटाळा प्रकरण आणि कृषी महोत्सवासाठी देणगीच्या नावाखाली पैसे लाटण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर आता दादा भुसे यांचा हा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरणी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अब्दुल सत्तार तर दुसरीकडे दादा भुसे यांचा या व्हिडीओचा प्रकार यामुळे सत्ताधाऱ्यांची तारेवरची कसरत होणार आहे. दादा भुसे व्हायरल व्हिडीओवर काय उत्तर देतात, आणि यावर विरोधकांचं समाधान होतेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.