नाशिक - मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरावर झालेला हल्ला ( Silver Oak Attack ) हा अतिशय निंदनीय आहे. हल्ला करणारे कर्मचारी असले तरी यामागे कोणाचे डोके आहे, याचा शोध पोलीस नक्कीच घेतली. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal on Silver Oak Attack) यांनी व्यक्त केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या ( MSRTC Workers ) अनेक मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. पुढे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतही राज्य सरकार सकारात्मक असणार आहे. उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court on MSRTC ) दिलेल्या आदेशाचे पालन राज्य सरकार करणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला. मग हे आंदोलन करण्याची गरज काय, असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार यांनी सातत्याने बैठका घेतल्या होत्या, ते कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आहेत. मात्र, काही मंडळीनी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, असेही यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
दगड फेकणारे हात कर्मचाऱ्यांचे,डोकं मात्र वेगळ्याचे - एसटी कर्मचारी शांततेत आंदोलन ( Strike ) करत होते. अनेक नेते आंदोलनस्थळी भेटायला गेले. त्यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी त्यांनी दगड नाही हातात घेतले, दोन दिवसांपूर्वी सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांनी विजय झाला म्हणून आनंद साजरा केला. मग, दुसऱ्या दिवशी दगड मारण्याचे कारण काय आहे, असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. या मागे दगड मारणारे हात जरी कर्मचाऱ्यांचे असतील मात्र, डोके कोणा वेगळ्या व्यक्तीचेच आहे, याचा शोध पोलीस नक्कीच घेतली, असे मंत्री भुजबळ म्हणाले.
हेही वाचा - Silver Oak Attack : ..म्हणजे तुम्ही पवारांचं मुंडकं उडवण्याची भाषा करताय : जितेंद्र आव्हाड आक्रमक