ETV Bharat / state

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी - छगन भुजबळ - nashik yevla latest news

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबतचा आढावा घेत त्यासाठी मुदत वाढीबाबत आदेश यावेळी पालकमंत्री यांच्याकडून देण्यात आलेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचनाही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याच्याही सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

minister chhagan bhujbal on police action of citizen without mask and physical distance
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी
author img

By

Published : Oct 3, 2020, 6:34 PM IST

Updated : Oct 3, 2020, 7:46 PM IST

येवला ( नाशिक ) - नागरिकांमध्ये मास्क आणि डिस्टन्स बाबत जनजागृती करण्यासोबतच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिल्या आहेत. कोरोना व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज येवला शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली, या वेळी ते बोलत होते.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी

ते म्हणाले, की तालुक्याला मिळालेले सर्व व्हेंटिलेटर्स सुरू करण्यात यावेत. ते सुरू झाल्यानंतर त्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व स्टाफची नेमणूक करण्यात यावी. येवला उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन लाईनसह राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करून तातडीने सुरू करण्यात यावेत.
आमदार नरेंद्र दराडे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबतचा आढावा घेत त्यासाठी मुदत वाढीबाबत आदेश यावेळी पालकमंत्री यांच्याकडून देण्यात आलेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचनाही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याच्याही सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाड प्रांतधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाग्रहा, उपअभियंता देवरे, उन्मेष पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजाराम , उपअभियंता प्रजापती, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख,सहायक निबंधक एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, तालुका पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे आदी उपस्थित होते.

Last Updated : Oct 3, 2020, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.