ETV Bharat / state

महिलांबाबत आक्षेपार्ह बोलणे ही आपली संस्कृती नाही - पालकमंत्री भुजबळ

भाजप आयटी सेलचे ( BJP IT Cell ) प्रमुख गजारिआ यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दानंतर ( Offensive Tweet against Rashmi Thackeray ) राजकीय वातावरण तापले असून पालकमंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांना खडेबोल सुनावत ही भारतीय संस्कृती नसून महिलांबाबत बोलताना काळजी घ्यावी, असा सल्ला दिला.

पालकमंत्री भुजबळ
पालकमंत्री भुजबळ
author img

By

Published : Jan 8, 2022, 5:04 PM IST

नाशिक- भाजप आयटी सेलचे ( BJP IT Cell ) प्रमुख गजारिआ यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दानंतर ( Offensive Tweet against Rashmi Thackeray ) राजकीय वातावरण तापले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांना खडेबोल सुनावत ही भारतीय संस्कृती नसून महिलांबाबत बोलताना काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

प्रत्येक व्यक्तीची सुरक्षाची जवाबदारी आमची

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.8 जानेवारी) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गजारिआ यांनी रश्मी ठाकरेंना राबडी देवीची ( Rabri Devi ) उपमा दिली होती. त्यानंतर मोठा गदारोळ माजला व संबंधितावर गुन्हा दाखल झाला. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. कुणाबद्दलही अपमानास्पद बोलू नये. बोलताना ती काळजी घ्यावी. महिलांच्या संदर्भात तर बोलताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. नागपूर येथील संघ मुख्यालयाची रेकी करणार्‍या पाकिस्तानी हेरला ताब्यात घेतल्याबाबत बोलताना संघ मुख्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीची सुरक्षाची जवाबदारी आमची आहे, असे भुजबळ यानी सांगितले आहे.

गंगा किनारी मृतदेह आढळतात

निवडणूक काळात लाखोंच्या सभा होतात. निवडणुकानंतर कोरोना वाढल्याचे आकडे समोर येतात. काही ठिकाणी ते लपवले जातात. नंतर मग 'गंगा किनारी मृतदेह' आढळून येतात, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला. तसेच राज्यातील निवडणुकांबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकित निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - School Closed in Nashik : 1 ली ते 9 वी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून बंद; पालकमंत्र्यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.