नाशिक - सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या गावात एका गतिमंद विवाहितेवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दीपक काशिराम पवार, दीपक आनंदा पवार, सुरेश शिवराम शेवरे, अशोक पुनाजी गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सर्व संशयित 20 ते 25 वयोगटातील असून मद्यपान करून त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - नाशिकमधील घाऊक बाजारात कांद्याचे भाव घसरले; शेतकरी चिंताग्रस्त
या चौघांनी गतिमंद विवाहितेस फूस लावून गावाच्या पश्चिमेस एका शेतात नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या बहिणीने सकाळी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. या बाबत पिडीतेच्या बहिणीने तिच्या गतिमंद बहिणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडखे करत आहेत.