ETV Bharat / state

Maratha Reservation : सरकारनं दीड वर्षात मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली का नाही? - मुख्यमंत्री एकनाथ शिं

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली. 'सह्याद्री' अतिथीगृहात झालेल्या बैठकीला सत्ताधारी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीसोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना निमंत्रण होतं. या सर्वपक्षीय बैठकीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chhatrapati Sambhajiraje
छत्रपती संभाजीराजे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 9:14 AM IST

Updated : Sep 12, 2023, 9:37 AM IST

माहिती देताना छत्रपती संभाजीराजे

नाशिक : Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सोमवारी 'सह्याद्री' येथे सर्वपक्षीय बैठक पार (All Party Meeting) पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे देखील (Chhatrapati Sambhaji Raje) उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना बोलवलं, याचं कौतुक आहे. भावना आणि न्यायिक भूमिका यांचा समन्वय बैठकीत साधला जाईल, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर असतांना ते पत्रकारांशी बोलत होते.

सरकारला विचारणार जाब : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत मराठा समाज आहे. इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवलं? मी संसद आवारात जाऊन आंदोलन केलं होतं. तसंच राणे समितीने आरक्षण दिलं होतं, पण ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही. या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

कृषिमंत्री सभेत व्यस्त : एकीकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात आत्महत्या वाढत असून, ही बाब चिंताजनक आहे. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या कृषी धोरणात अजूनही बदल झाला नाही. लाँग टर्म पॉलिसी यायला हवी आहे. कृषिमंत्री सध्या उत्तर सभा घेण्यात व्यस्त आहेत. जे काही राजकारणात चालू आहे, त्यात लोकांना इंटरेस्ट नाही. महाराष्ट्रातील जनतेकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

सरकारने कडक कायदा आणावा : सातारा जिल्ह्यात सोशल मीडिया पोस्टवरून वाद निर्माण (Riots in Satara) झाला होता. यात दोघांचा मृत्यू झाला असून, काहीजण जखमी झाले आहेत. या घटनेवर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, सध्या सोशल मीडियामुळे सामाजिक तणाव वाढत आहे. यासाठी सरकारने कडक कायदा आणावा. तसंच वातावरण दूषित करणाऱ्या लोकांना थांबवण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा -

  1. Sambhaji Raje Meet KCR : तेलंगणाचे प्रगतीचे मॉडेल महाराष्ट्रासह देशभरात पसरले पाहिजे, संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री केसीआर यांची भेट
  2. Chhatrapati Sambhajiraje : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार - छत्रपती संभाजीराजे
  3. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं; सर्वपक्षीय बैठकीत एकमतानं ठराव मंजूर, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार

Last Updated : Sep 12, 2023, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.