ETV Bharat / state

मासेमारीसाठी गिरणा धरणात विष प्रयोग, शेकडो माशांचा मृत्यू - dead fishes girna dam

याआधी देखील अशाप्रकारे विषप्रयोग झाल्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडले होते. दरम्यान, विषबाधा टाळण्यासाठी मालेगाव प्रशासनाच्यावतीने धरणातील मासेविक्री तात्पुरती थांबवण्यात आली आहे. मात्र, विष प्रयोगामुळे शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्यान मालेगावात भीतीचे वातावरण आहे.

मृत मासे
मृत मासे
author img

By

Published : Oct 17, 2020, 3:42 PM IST

नाशिक- मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात काल (१६ ऑक्टोबर) शेकडो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे मालेगावचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात मासेमारी करण्यासाठी वीष प्रयोग करण्यात आला असून, त्यामुळे धरणातील असंख्य माशांचा मृत्यू झाला आहे. काल सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यामुळे संपूर्ण मालेगावात खळबळ माजली आहे. मनपाच्या पम्पिंगवर पाणी उपसा करताना अडथळा येत असल्याने कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी पहाणी केली. यावेळी शेकडो क्विंटल मासे मृतावस्थेत याठिकाणी तरंगत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

माहिती देताना मालेगाव मनपाचे आयुक्त त्र्यंबक कासार

या घटनेची गांभीर्याने दखल घेत कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. अवघ्या काही वेळातच पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी करत पाणी पुरवठा बंद करण्यात यावा, अशा सूचना केल्या. तसेच, अज्ञातांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

त्याच बरोबर, राज्याचे कृषिमंत्री आणि मालेगावचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. माशांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी माशांचे नमुने देखील मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरण मासेमारीचा ठेका एका खासगी कंपनीने घेतला असल्याने स्थानिक मच्छीमार आणि कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये होत असलेल्या वादातून विषारी द्रव्य टाकून मासे मारण्याचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याआधी देखील अशाप्रकारे विषप्रयोग झाल्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडले होते. दरम्यान, विषबाधा टाळण्यासाठी मालेगाव प्रशासनाच्यावतीने धरणातील मासेविक्री तात्पुरती थांबवण्यात आली आहे. मात्र, विष प्रयोगामुळे शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्याने मालेगावात भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा- सलग दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद, लिलाव सुरू न झाल्यास शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.