नाशिक - अनकवाडे येथील शेतकरी शिवाजी साहेबराव जाधव यांच्या शेतात काढून ठेवलेल्या मक्याच्या चाऱ्याला आग लागल्याची घटना घडली. यात 8 ट्रॉली चारा जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मनमाड येवला रोडवर असलेल्या अनकवाडे येथील शेतकरी शिवाजी साहेबराव जाधव यांच्या शेतातील मका काढल्यावर 8 ट्रॉली चारा काढून ठेवला होता. त्याला अचानकपणे आग लागली आणि संपूर्ण चारा जळून खाक झाला. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच मनमाड नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. जवानांनी मदतीने आग आटोक्यात आणली.
जनावरांसाठी एकत्रित करुन ठेवला चारा -
मनमाड नजीक असलेल्या अनकवाडे शिवारात अनेक शेतकऱ्यांनी मका काढली आणि जनावरांसाठी चारा एकत्रित करून ठेवला आहे. या चाऱ्याला आग लागेल, अशा ठिकाणापासून दूर ठेवावे, असे आवाहन अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा - 'लव्ह जिहाद करणाऱ्यांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी!'