नाशिक - साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपिठ असलेला सप्तशृंगीगड आज (१ एप्रिल)पासून सोमवार (५ एप्रिल)पर्यंत दर्शनासाठी बंद असणार आहे. कळवण तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
वाढत्या रूग्ण संख्येमुळे जनता कर्फ्यूचा निर्णय -
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपिठ असलेल्या सप्तशृंगीगड आणि कळवण तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण आढळल्याने मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. मंदिर जरी बंद असले तरी सप्तशृंगी देवीची दैनंदिन पंचामृत महापूजा व आरती सुरू असेल. भाविकांनी मंदिर बंद असलेल्या सूचनेची दखल घेऊन व्यवस्थापनासह जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.