ETV Bharat / state

नाशकात सॅनिटायझरच्या भडक्याने एकाचा मृत्यू - नाशिक सॅनिटायझर मृत्यू

नाशिकच्या उपनगर परिसरातील नवकार सोसायटीत राहणारे अनिल सुचक यांचा सॅनिटायझरने पेट घेतल्याने मृत्यू झाला आहे. मृत अनिल सूचक हे त्यांच्या घरातील किचनमध्ये मोठ्या ड्रममधून छोट्या बॉटलीमध्ये सॅनिटायझर भरत होते.

Sanitizer
सॅनिटायझर
author img

By

Published : Sep 2, 2020, 4:15 PM IST

नाशिक - कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे सॅनिटायझर जसे उपयोगी आहे तसेच घातकही ठरत आहे. नाशिक शहरात सॅनिटायझरने दुसरा बळी घेतला. नाशिकच्या उपनगर परिसरात राहणाऱ्या अनिल जयंतीलाल सूचक या ५६ वर्षीय व्यक्तिचा सॅनिटायझरने पेट घेतल्याने मृत्यू झाला.

सॅनिटायझरच्या भडक्याने एकाचा मृत्यू

नाशिक शहरामध्ये गेल्या महिन्यात वडाळा परिसरात एका महिलेचा सॅनिटायझरचा भडका होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना नाशिकच्या उपनगर परिसरातील नवकार सोसायटीत राहणारे अनिल सुचक यांचाही सॅनिटायझरने पेट घेतल्याने मृत्यू झाला आहे. मृत अनिल सूचक हे त्यांच्या घरातील किचनमध्ये मोठ्या ड्रममधून छोट्या बॉटलीमध्ये सॅनिटायझर भरत होते. त्याचवेळी गॅस सुरू असल्याने सॅनिटायझरने पेट घेतला. या दुर्घटनेत ते ६५ टक्के भाजल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांना मधुमेहाचाही त्रास असल्याने त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही व त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनामुळेमध्ये सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, त्याचा वापर योग्य प्रकारे न केल्यास तो जिवघेणा ठरू शकतो, हे नाशिकमधील दोन घटनांनी अधोरेखीत केले आहे. त्यामुळे सॅनिटायझर वापरताना आणि हाताळताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.