ETV Bharat / state

मालेगाव : अतिवृष्टीमुळे बंधारा फुटला, पिकांच्या नुकसानीसह अनेक जनावरे गेली वाहून

अतिवृष्टीमुळे कलमदरा बंधारा फुटला आणि अनेक गावांमध्ये पाणी शिरले. यात २३० हून अधिक हेक्टरवरिल पिकांचे नुकसान झाले. तर १७५ पेक्षा जास्त जनावरे पाण्यात वाहून गेली.

malegaon Kalamdara Bandhara Burst due to heavy rains
मालेगाव : अतिवृष्टीमुळे बंधारा फुटला, पिकांच्या नुकसानीसह अनेक जनावरे गेली वाहून
author img

By

Published : Sep 12, 2020, 10:33 AM IST

मालेगाव ( नाशिक ) - मागील दोन दिवसांपासून तळवाडे भागात अतिवृष्टी होत आहे. अशात कलमदरा बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आणि बंधारा फुटला. या बंधाऱ्यातील पाणी तळवाडे, आंबसन, गारेगाव वाघखोरे यासह अनेक गावांमध्ये शिरले. यात २३० हून अधिक हेक्टरवरिल शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर १७५ पेक्षा जास्त जनावरेही वाहून गेली आहेत. दरम्यान, अद्याप या घटनेत सुदैवाने जीवीतहानी झालेली नाही.

बंधारा फुटल्यानंतरची दृश्य...

नाशिक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून मालेगाव परिसरात देखील अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे तळवाडे भागात असलेल्या कलमदरा बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आणि बंधारा फुटला. या बंधाऱ्यातील पाणी तळवाडे, आंबसन, गारेगाव, वाघखोरे यासह अनेक गावामध्ये शिरले. बंधारा फुटल्याने ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि पाण्यात गायी, म्हशी, शेळ्या आदी सुमारे १७५ पेक्षा जास्त जनावरे वाहून गेल्याचा अंदाज आहे. याशिवाय तब्बल २३० हेक्टरवरील उभे पीक उध्वस्त झाले आहे. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली.

बंधारा फुटल्याची माहिती मिळताच पाटबंधारे, महसूल विभागाचे अधिकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्याला सुरूवात केली. सुमारे २५ वर्षांपूर्वी हा बंधारा बांधण्यात आला आहे. पण अचानक बंधाऱ्याला भगदाड कसे पडले याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सी. आर. राजपूत यांनी दिली. शिवाय नुकसानीचे पंचनामे करण्याचे देखील आदेश राजपूत यांनी दिले आहेत.

हेही वाचा - चोरट्यांचा लाखोंच्या कांदा बियाण्यांवर डल्ला, कळवणमध्ये दोन कृषी सेवा केंद्र फोडली

हेही वाचा - नाशिक: चार एकरवरील कोथिंबिरीतून १२ लाखांचे उत्पादन; खोटा फोटा व्हायरल झाल्याने शेतकऱ्याला त्रास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.