नाशिक - मालेगाव शहरातील महेश नगर येथे माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर गोळीबार झाला होता. गोळीबार करणारे आरोपी फरार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. यामधील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
शेख इमरान शेख खालीद उर्फ इमरान बाचक्या (वय-२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो अख्तराबादचा रहिवासी आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोलीचा डीव्हीसीएम विलास कोल्हाचे एके-४७ सह पोलिसांसमोर आत्मसमर्पण
काय आहे प्रकरण ?
महेश नगरमधील माजी नगरसेवकाच्या बंगल्यात प्रवेश करून पिस्तुलातून नऊ राउंड्स फायर करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चोवीस तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधीक्षक आरती सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच उप अधीक्षक रत्नाकर नवले यांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी संबंधित कारवाई केली आहे.