ETV Bharat / state

Makar Sankranti Ornaments : हलव्यांच्या दागिन्यांचा बाजारपेठेला चढला साज, परदेशातही मागणी - Makar Sankranti

दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रातीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर महिलांना संक्रातीच्या हळदीकुंकू समारंभाचे वेध लागले आहेत. त्या पाठोपाठ नववधू, जावई आणि लहान मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांच्या (Halwa Ornaments) खरेदीची लगबग शहरात सुरू आहे. त्यामुळे आकर्षक व वैविध्यपूर्ण आकाराच्या हलव्यांचे दागिन्यांचा साज बाजारपेठेला (Overview of Sankranti Markets) चढला आहे.

Makar Sankranti 2023
हलव्यांच्या दागिन्यांचा बाजारपेठेला साज
author img

By

Published : Jan 4, 2023, 7:58 PM IST

Updated : Jan 12, 2023, 11:02 AM IST

प्रतिक्रिया देतांना ग्राहक

नाशिक : मकर संक्रातीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर सध्या बाजारपेठेमध्ये (Overview of Sankranti Markets) हलव्यांच्या दागिने (Halwa Ornaments) खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. या दागिन्यांमध्ये लहान मुलांप्रमाणे मोठ्यांसाठी ही सेट तयार करण्यात आले आहेत. लहान मुलांच्या सेटमध्ये हार, बाजूबंद, किरीट, मोबाईल, घड्याळ असून महिलांच्या सेटमध्ये मंगळसूत्र, हार, नेकलेस, कर्णफुल, बांगड्या, चिंचपेटी असे दागिने आहेत. तर पुरुषांसाठी ब्रेसलेट, रुद्राक्षकंठी, हार, गुच्छ, पेन, घड्याळ या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत.

असे आहेत दर : पुरुषांच्या दागिन्याचे सेट 200 ते 800 रुपये किमतींचे आहेत. महिलांच्या दागिन्यांच्या सेट 400 ते 1200 रुपये किमतींचे आहेत. तर मुलांच्या दागिन्यांच्या सेट 100 ते 300 रुपये किमतींचे आहेत. मुलींसाठीचा ताज 200 रुपये पासून सुरु होतो आहे.

परदेशातूनही मागणी : हलव्यांच्या दागिन्यांना परदेशातून मोठी मागणी आहे. दरवर्षी परदेशातून तीसहून अधिक ग्राहक दागिन्यांची मागणी करतात. जशी ग्राहकांची मागणी असते, त्या आकाराचे दागिने तयार करून त्यांना दिले जातात. विशेष करून दागिन्यांच्या सेट खरेदी कडे शहरातील नागरिकांसह परदेशी ग्राहकांचाही कल दिवसेंदिवस वाढत आहे, असं व्यवसायिकांनी सांगितले.

लहान मुलांचे बोर न्हाण : संक्रातीनंतर रथसप्तमी पर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे बोर न्हाण करण्यात येते. यावेळी एका पाटावर बाळाला बसवले जाते, त्याच्या भोवती इतर लहान मुलांना बसवले जाते, त्याला काळा रंगाचे कपडे परिधान केले जातात, त्यानंतर अंगावर हलव्याचे दागिने डोक्यावर मुकुट, हातात बासरी, गळयात माळ अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांनी सजवलं जातं. त्याच्या डोक्यावरून बोरं, कुरमुरे, चॉकलेट, गोळ्या यासारख्या मुलांना आवडणाऱ्या पदार्थांचा अभिषेक करण्यात येतो.

नवविवाहितेचे हळदीकुंकू : नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम संक्रांतीला नवविवाहितेला काळ्या रंगाचे वस्त्र खरेदी केले जाते. तसेच त्यांच्यासाठी हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकू साठी बोलवतात. त्यांना तिळगुळ, हलवा, वाणात उपयुक्त छोटी भेटवस्तू म्हणून देतात. सांस्कृतिक दृष्ट्या या सणाला फार महत्त्व आहे. तर काही महिला केवळ संक्रांतीच्या दिवशीच सुगळ्याचे वाण देतात. सुगळ्याचे वाण हे प्रथम देवाजवळ ठेवले जाते. एका मातीच्या लहान मडक्यात बोरं, ऊस, गहू, तिळाचा लाडू, आणि वाटाण्याच्या शेंगा टाकल्या जातात. आधी हे सुगडे देवाजवळ ठेवले जाते. त्याची पूजा केली जाते. आणि मग संक्रांतीच्याच दिवशी आगदी जवळच्या अश्या पाच महिलांना बोलावुन त्यांना तो वाण दिला जातो. या वाणाला देखील या दिवशी एक आगळे वेगळे महत्व आहे. विशेष म्हणजे हे वाण सगळ्यांच्याच घरी न करता, काही विशिष्ट घरीच दिले जाते.

Last Updated : Jan 12, 2023, 11:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.