ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वर: महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द,10 ते 14 मार्च दरम्यान 144 कलम लागू - त्र्यंबकेश्वर महाशिवरात्री बद्दल बातमी

त्र्यंबकेश्वर येथील महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. 10 ते 14 मार्च दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरात 144 कलम लागू.

Mahashivaratri festival at Trimbakeshwar canceled on the backdrop of Corona
त्र्यंबकेश्वर येथील महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द,10 ते 14 मार्च दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरात 144 कलम लागू
author img

By

Published : Mar 6, 2021, 10:33 PM IST

नाशिक - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे होणारा महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर येथील महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द,10 ते 14 मार्च दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरात 144 कलम लागू

त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिर हे 11 मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी बंद करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवारी संध्याकाळी प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

10 ते 14 मार्च दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरात 144 कलम लागू -

महाशिवरात्रीच्या दिवशी निघणारी पालखी ही कोठेही न थांबता थेट शिवमंदिरात म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाईल आणि विधिवत पूजाअर्चा केली जाईल. असाही निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत प्रशासन अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे आणि करोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले आहे. महाशिवरात्रीला त्र्यंबकराजांची मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा केली जाईल, दरवर्षी हजारो भाविक महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकेराज्याच्या दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे यंदा ही गर्दी होऊ नये, कोरोनाचे सर्व नियम पाळले जावेत त्याकरिता पोलीस प्रशासनाने देखील 10 ते 14 मार्च दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरात 144 कलम लागू करून जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.