ETV Bharat / state

नाशिकमध्येही 'टास्क फोर्स' तयार करणार - आरोग्यमंत्री - टास्क फोर्स

सतत विनंती करुनही जर रुग्णालय सुरु ठेवत नाही. त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Apr 29, 2020, 8:15 PM IST

Updated : Apr 29, 2020, 9:17 PM IST

नाशिक - मालेगाव मधील परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यातील उत्तम डॉक्टरांची टास्क फोर्स टीम तयार केली जाणार आहे. या शिवाय ज्या भागातील नागरिक वैद्यकीय यंत्रणा आणि पोलिसांना सहकार्य करणार नाहीत, अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबधीत अधिकाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे

नाशिक जिल्ह्यासह मालेगावमधील कोरोना परिस्तितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहे.नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांसह विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थीत होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण आटोक्यात येत असताना विविध आजारांनी मृत्यू झालेल्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे नाशिक येथे 200 खाटांचे शासकिय रुग्णालय हे कोरोना नसलेल्या इतर रुग्णांसाठी राखीव करण्यात आले आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, असे शंभर जणांचे पथक तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी काहीजण आपल्या कर्तव्यावर अजूनही उपस्थित नाहीत. त्यांना हजर राहण्यसाठी 24 तासांची वेळ दिली आहे. कामावेळी पीपीई किट देण्यात येईल कामांच्या वेळाही त्यांच्या पद्धतीने ठरविण्यात येतील. पण, जर दिलेल्या वेळे जे हजर राहणार नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

...अन्यथा खासगी रुग्णालयाचे परवाने रद्द केले जातील

रुग्णसेवा देण्यासाठी खासगी रुग्णालये सुरु ठेवण्याची विनंती राज्य शासनाकडून सर्व डॉक्टरांना देण्यात आली आहे. पण, काही जण रुग्णालये सुरु करत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहे. जर खासगी डॉक्टरांना कोरोनाची भीती वाटत असेल तर त्यांना हवे तितके पीपीई किट राज्य शासनाकडून देण्यात येतील. पण, सतत विनंती करुनही जर रुग्णालय सुरु ठेवत नाही. त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

हेही वाचा - ...तर पोलिसी खाक्या दाखवा - गृहमंत्री

Last Updated : Apr 29, 2020, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.