ETV Bharat / state

नाशिक ढोलच्या गजरात महाजनादेश यात्रेचे नाशिक शहरात जंगी स्वागत

author img

By

Published : Sep 18, 2019, 8:55 PM IST

नाशिक ढोलच्या गजरात महाजनादेश यात्रेचे नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत नाशिकच्या प्रमुख मार्गावरून रोड शो करत बाईक रॅली काढण्यात आली.

बाईक रॅली

नाशिक - महाजनादेश यात्रेचे शहरात नाशिक ढोलच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत नाशिकच्या प्रमुख मार्गावरून रोड शो करत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत ३ हजारांहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते. पाथर्डी फाटा परिसरातून निघालेली ही रॅली सिडको, त्रंबक सिग्नल, मेनरोड, रविवार कारंजा मार्गाने पंचवटी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

महाजनादेश यात्रेचे स्वागत होताना

रोड शो दरम्यान ठिकाणी पारंपरिक नृत्य, ढोल ताशे, मल्लखांबाचे तसेच विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक केले. तसेच फुलांच्या वर्षाव करण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनाचे मुख्यमंत्र्यांनी हात दाखवून आभार मानले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात आली. आज नाशिकमध्ये या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला आहे. उद्या (गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या तपोवन येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी उत्तर महाराष्ट्रातून ३ लाख नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पाच हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

Intro:नाशिक ढोलच्या गजरात महाजनादेश यात्रेचं नाशिक शहरात जंगी स्वागत...

Body:नाशिक ढोलच्या गजरात महाजनादेश यात्रेचं नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात आलं,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन,जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत नाशिकच्या प्रमुख मार्गावरून रोड शो करत बाईक रॅली काढण्यात आली,ह्या रॅलीत 3 हजार हुन अधिक बाईकस्वार सहभागी झाले होते,पाथर्डी फाटा परिसरातून निघालेली ही रॅली सिडको ,त्रंबक सिग्नल, मेनरोड ,रविवार कारंजा मार्गाने पंचवटी
येथे ह्या रॅलीचा समारोप करण्यात आला,

रोड शो दरम्यान ठिकाणी पारंपारिक नृत्य, ढोल ताशे, मल्लखांबाचे तसेच विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक करत

फुलांच्या वर्षाव महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत केलं,

यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनाचे मुख्यमंत्र्यांनी हात दाखवून आभार मानले, आगामी विधानसभा निवडणुकी अगोदर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात आली, आज नाशिकमध्ये या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला असून उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या तपोवन येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे,,या सभेसाठी उत्तर महाराष्ट्रातुन 3 लाख नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे,तसेच कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये ह्यासाठी पाच हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उद्या उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे ...
वॉक थ्रू कपिल भास्कर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.