ETV Bharat / state

Loudspeaker Issue Malegaon : मालेगावातील सर्वच ठिकाणी भाेंग्यांच्या आवाजाची बंधने पाळली जाणार; शांतता समितीच्या बैठकीत निर्णय

author img

By

Published : Apr 14, 2022, 7:28 PM IST

Updated : Apr 14, 2022, 7:41 PM IST

सर्वच ठिकाणी भाेंग्यांच्या आवाजाची बंधने ( Loudspeaker sound rules ) पाळली जातील, असा एकमुखी निर्णय मालेगावातील सर्वच समाजबांधव व शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन पाटील ( District Police Superintendent Sachin Patil ) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loudspeaker Issue
Loudspeaker Issue

नाशिक - सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मालेगावातील सर्वच ठिकाणी भाेंग्यांच्या आवाजाची बंधने ( Loudspeaker sound rules ) पाळली जातील, असा एकमुखी निर्णय मालेगावातील सर्वच समाजबांधव व शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन पाटील ( District Police Superintendent Sachin Patil ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी आगामी सर्वच सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मालेगावला अतिरिक्त पाेलीस बंदाेबस्त ( Additional Police coverage to Malegaon ) तैनात केला असून विशिष्ट जातीपाती व धर्माच्या नावे सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मेसेज व तेढ निर्माण करणाऱ्यांवर नजर ठेवली जात असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक सचिन पाटील दिली आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक

आगामी विविध सण-उत्सव, यात्रा तसेच पवित्र रमजान महिना व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात ४० पोलीस ठाणे निहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ०२ अपर पोलीस अधीक्षक, ०६ पोलीस उपअधीक्षक, ३१ पोलीस निरीक्षक, १२८ सहायक निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक, १ हजार २६३ पोलीस अंमलदार, ९०० होमगार्ड, तसेच ०२ एस. आर. पी. एफ. कंपनी, ०२ स्ट्रायकिंग फोर्स, ०५ आरसीपी, क्यूआरटी प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

समाजकंटकांची यादी तयार : अनुचित प्रकार घडु नये, यासाठी ग्रामीण पोलीसांतर्फे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला असून सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या तसेच जातीय दंगे भडकविणाऱ्या समजाकंटकांची पोलीस ठाणेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून कोणीही व्हॉटसअँप इतर सोशल मिडीयावर सामाजिक, धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यासंबंधाने संबंधीत व्यक्तीवर तसेच ग्रुप अँडमिनवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

'सर्वांनी एकाेपा ठेवावा' : नफरत की आग लगाने मैं एक ही पल लगता है, पर उसे बुझाने मैं जमाना निकल जाता है. त्यामुळे सर्वांनी एकाेपा ठेवावा. मालेगाव संवेदनशील असल्याने येथे शांतता समितीची बैठक झाली. त्यात सर्व धर्मीय व समिती सदस्यांनी भाेंग्यांबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या बंधनानुसार आवाज मर्यादा पाळणार असल्याचे सांगितले आहे. तसेच साेशल मीडियावर पाेलिसांचा वाॅच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यानी सांगितले आहे.

हेही वाचा - Gunratna Sadavarte : सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले, सदावर्तेंनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

Last Updated : Apr 14, 2022, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.