नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या व्हायरसचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनासोबत सण-उत्सवावर देखील झाला आहे. अनेक ठिकाणी होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अशातच आज नाशिकमध्ये भगवान महावीर जयंती ठिकठिकाणी सोसायटी-परिसरात साजरी करण्यात आली.
ही जयंती साजरी करताना सोशल डिस्टन्सिंगचे भान सर्वांनी राखले होते. एक मीटर अंतर राखून भगवान महावीर यांच्या प्रतिमेला फुले वाहून आरती करण्यात आली. या उत्सवात महिलांचा सहभाग अधिक दिसून आला. जगात आलेले कोरोना नावाचे संकट दूर व्हावे, अशी मनोभावाने प्रार्थना यावेळी करण्यात आली.