ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : लॉकडाऊनचा परिणाम मातीच्या वस्तु विक्रीवरही.. व्यावसायियकांचे 50 टक्केहून अधिक नुकसान

लॉकडाऊनचा परिणाम अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजेला लागणाऱ्या कराव केळी ( मातीची मडकी) वर देखील मोठा झाला आहे. मातीची वस्तू घडवणाऱ्या कलाकारांचे दरवर्षीपेक्षा यावर्षी 50 टक्केहून अधिक नुकसान झाले आहे..

Lockdown also affects the sale of pottery
लॉकडाऊनचा परिणाम मातीच्या वस्तु विक्रीवरही
author img

By

Published : Apr 26, 2020, 12:44 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम मनुष्याच्या दैनंदिन जीवनासोबतच भारतीय सणवारांवर देखील झाला आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजेला लागणाऱ्या कराव केळी ( मातीची मडकी) वर देखील मोठा परिमाण झाला आहे. मातीची वस्तू घडवणाऱ्या कलाकारांचे दरवर्षीपेक्षा यावर्षी 50 टक्केहून अधिक नुकसान झाले आहे.

लॉकडाऊनचा परिणाम मातीच्या वस्तु विक्रीवरही
नाशिकच्या पंचवटी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मातीची वस्तू घडवणाऱ्या कलाकारांची दुकानं आहेत. मात्र कोरोनामुळे पहिल्यांदाच त्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. दरवर्षी अक्षय तृतीयाला लागणाऱ्या कराव केळी ( मातीची मडकी) खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकच नसल्याचे दुकानदार सांगतात.

दरवर्षी हे व्यावसायिक 10 ते 12 हजार कराव केळीची विक्री करतात. मात्र यावर्षी 1 ते 2 हजाराच्या करावकेळीची विक्री झाल्याचे व्यावसायिक सांगतात. त्यामुळे इतर उद्योग धंद्यासोबत मातीची वस्तू घडवणाऱ्या कष्टकरी कलाकारांना देखील लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.