ETV Bharat / state

नाशिकमध्ये दारूविक्रेत्यांचा ऑनलाइन विक्रीला विरोध.. मद्यपींमध्ये संभ्रम - nashik corona update

कोरोना संक्रमणाची भीती व्यक्त करत दारू विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाला धुडकावून लावत सर्रासपणे सामान्य दारू विक्री सुरूच ठेवल्याने मद्यपींमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : May 22, 2020, 12:24 PM IST

नाशिक - दारू विक्रीवरून असलेला गोंधळ काही केल्या कमी होताना दिसत नाही. एकीकडे सरकार दारू घरपोच द्यावी, असा अट्टाहास करत असले तरी दुसरीकडे याच निर्णयाला दारू विक्रेत्यांनी विरोध दर्शवला आहे. कोरोना संक्रमणाची भीती व्यक्त करत दारू विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाला धुडकावून लावत सर्रासपणे सामान्य दारू विक्री सुरूच ठेवल्याने मद्यपींमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

बाईट - प्रवीण बोरा - दारू विक्रेता, बाईट - डॉ मनोहर अंचुले - अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

४ मे रोजी दारूची दुकाने सुरू होणार म्हणून पहिल्याच दिवशी प्रत्येक दारू दुकानाबाहेर गोंधळ झाला. हा गोंधळ पाहून जिल्हा प्रशासनाने दारू विक्रीचा निर्णय तत्काळ रद्द केला. मात्र, पुन्हा चार दिवसांनी दारू विक्रीला सुरुवात झाली. पुन्हा तेच घडले, पोलीस बंदोबस्तात दारूविक्री सुरू झाली. मात्र, पहिल्या दिवशी जे घडले तेच पुन्हा घडले. कोरोनाच्या संक्रमणाची भीती पुन्हा सुरू झाली आणि दारूची 'होम डिलीव्हरी' करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यावर दारू विक्रेत्यांनी आरोग्य सुरक्षासह अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत विरोध दर्शवला.

दारू विक्रीवरून गोंधळ असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थव्यवस्था किती मजबूत होत असल्याची आकडेवारी सांगत, सगळं काही सुरळीत असल्याचा दावा करत आहे. शिवाय कुठलाही गोंधळ होणार नाही, अशी उपाययोजना करत असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाकडून दिली जाते.

नाशिकला सुरुवातीपासूनच दारूविक्री आणि खरेदी विक्रीवरून गोंधळ सुरू आहे. कधी जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यातील गोंधळ. तर कधी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि शहर पोलिसांमधील गोंधळ. आणि आता सुरू झालाय तो पुन्हा राज्य उत्पादन शुल्क आणि दारू विक्रेत्यांमधील गोंधळ. त्यामुळे दारूचा गोंधळ कोरोना नष्ट होईल तेव्हा संपेल का? अशी चर्चाही मद्यप्रेमींमध्ये रंगू लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.