ETV Bharat / state

झोपलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, घराच्या अंगणातून ओढून नेत केले ठार - चिंचलेखैरे महिलेवर बिबट्याचा हल्ला

घराच्या अंगणात भोराबाई झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांना झोपेतून ओढून नेले. त्यांची मान, छातीचा भाग खाऊन जंगलात टाकून दिले.

झोपलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
झोपलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
author img

By

Published : Aug 8, 2020, 11:56 PM IST

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही महिला घराच्या अंगणात झोपलेली असताना मध्यरात्री बिबट्याने तिला जंगलात ओढून नेत ठार केले आहे. या खळबळजनक घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोराबाई महादू आगीवले, असे या महिलेचे नाव असून तिचा मृतदेह वन विभागाला व पोलिसांना घरापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर सापडला आहे.

इगतपुरी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचलेखैरे येथे आपल्या राहत्या घरात रात्री जेवण आटोपून भोराबाई यांची मुलगी, जावई व मुले घरात झोपली होती. भोराबाई या घराच्या अंगणात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांना झोपेतून ओढून जगलात नेले व त्यांची मान, छातीचा भाग खाऊन जंगलात टाकून दिले. सकाळी घरातील माणसे उठल्यावर त्यांना घराबाहेर भोराबाई अंथरुणात दिसल्या नाहीत. म्हणून त्यांनी आजू-बाजूच्या परिसरात शोधले. तेव्हा एका ठिकाणी झाडा-झुडपात रक्तबंबाळ अवस्थेत भोराबाई यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्यास ग्रामीण रुग्णालयात नेले.

शवविच्छेदनाची सोय इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात नसल्याने महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग या परिसरात सापळा लावून पिंजरा व कॅमेरे लावणार आहे. या परिसरातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वन विभाग अधिकारी रमेश डोमसे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.