ETV Bharat / state

नाशकात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटयाचा मृत्यू - leopard dies vehicle hit

त्र्यंबकेश्वर येथे एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. या बिबट्यावर वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

leopard dies in nashik
नाशिकमध्ये बिबट्याचा मृत्यू
author img

By

Published : Feb 17, 2020, 4:03 AM IST

नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्याजवळील ब्रम्हा व्हॅली येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला होता. या बिबट्याला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली.

नाशकात अज्ञात वाहनाची बिबटयाला धडक...

हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; हल्ल्यात पत्नी अन् सासू गंभीर जखमी

ब्रम्हा व्हॅलीजवळ रविवारी सकाळच्या सुमारास एक बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत ग्रामस्थांना आढळला. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने त्याला गंभीर जखमा होऊन रक्तस्त्राव होत होता. जखमी असल्याने त्याला चालताही येत नव्हते. ग्रामस्थांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कर्मचाऱ्यांसमोरच बिबट्याने प्राण सोडला. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.