ETV Bharat / state

सुरगाणा तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटया ठार

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आज सकाळी सात वाजता ही बाब उघडकीस आली. हा नर जातीचा बिबट्या असून अंदाजे एक ते दीड वर्षाचा आहे.

Nashik
मृत बिबट्या
author img

By

Published : Jun 10, 2020, 10:09 PM IST

नाशिक - अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सुरगाणा येथून जवळच असलेल्या वावरपाडा जवळील रस्त्यावर घडली. आज सकाळी सात वाजता ही बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच सुरगाणा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे एक ते दीड वर्षाचा आहे. दरम्यान नाशिक येथील सहाय्यक वनसंरक्षक शेवाळे, सुरगाणा वनक्षेत्रपाल सातपुते व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मृत बिबट्यास सुरगाणा येथे शवविच्छेदन करण्यासाठी हलवले. शवविच्छेदन केले असता वाहनाच्या धडकेत हा बिबट्या ठार झाला असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विहिरीत पडला होता बिबट्या . . . .

सहा सात वर्षांपूर्वी वावरपाडा येथील एका विहिरीत बिबट्या पडला होता. जवळपास तीस तासानंतर त्याची सुटका खाट विहिरीत टाकून करण्यात आली होती. तर गेल्या शुक्रवारी खोकरविहीर येथील विहिरीत बिबट्या पडला होता. अनेक प्रयत्न करुनही बिबट्या बाहेर येत नव्हता. अखेर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास विहिरीत टाकून ठेवलेल्या शिडीद्वारे बिबट्याने अंधाराचा फायदा घेत पलायन केले होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेला बिबट्या खोकरविहीर येथील विहिरीत पडलेला बिबट्या तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.