ETV Bharat / state

निफाड भागातील गोदाकाठ परिसरात ५ ते ६ बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद - godavari

या परिसरातून जाताना अनेक वेळा बिबट्यांनी दुचाकीस्वारांवर हल्ले केले असून त्यात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद
author img

By

Published : Feb 22, 2019, 9:29 PM IST

नाशिक - निफाड तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात असलेल्या करंजी खुर्द गावालगत खैरे पार्क परिसरात ५ ते ६ बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद झाला आहे. अमोल आणि वैभव निंबाळकर यांनी गुरुवारी रात्री गाडीतून हे दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केले.

बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद

त्यांनी याची माहिती तातडीने वन विभागाला दिली आहे. या परिसरातून जाताना अनेक वेळा बिबट्यांनी दुचाकीस्वारांवर हल्ले केले असून त्यात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्यांनी या परिसरात आत्तापर्यंत अनेक मोकाट जनावरांची शिकार केले आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. वन विभागानेही अनेक दिवसांपासून या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावलेले आहेत. बिबटे अजुनही पकडण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिकच्या निफाड भागातील गोदाकाठ परिसरात 5 ते 6 बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद...

निफाड तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात असलेल्या करंजी खुर्द गावालगत खारा नाला जवळील खैरे पार्क परिसरात 5 ते 6 बिबट्यांच्या टोळक्याचा मुक्त संचार अमोल व वैभव निबाळकर ह्या भावंडांनी गुरुवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान पीकअप गाडीतून मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला आहे,

निफाड तालुक्यातील नैताळे येथून आपले काम आटपून अमोल व वैभव निबाळकर हे दोघे भावंडे करंजी खुर्द येथे आपल्या गावी जात असताना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान खारा नाला जवळील खैरे पार्क परिसरात पिक गाडीचा लाईट मध्ये अचानक पाच ते सहा बिबट्याच्या टोळक्याचे दर्शन झाले, त्यांनी या बिबट्यांचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून याची माहिती तातडीने वन विभागाला दिली आहे, या परिसरातून जाताना अनेक वेळा बिबट्यानीं दुचाकीस्वारांवर हल्ले केले असून त्यात अनेक जण जखमी तर काही गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, बिबट्यांनी या परिसरात आत्तापर्यंत अनेक मोकाट जनावरे फस्त केले आहे, या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली असून या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने अनेक दिवसांपासून पिंजरे लावलेले असतात ह्या पिंजऱ्यात बिबटे येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..

वन विभागाच्या म्हणणं नुसार निफाड तालुक्यातील गोदावरी नदी काठ परिसरात बिबट्यांचा वावर मोठा आहे,ह्या भागात उसाची शेती असून बिबट्यानां दिवसा लपण्यासाठी चांगली जागा असून असू बाजूच्या वाड्या वस्तीवर कुत्रे तसेच पाळीव जनावर भक्ष्य म्हणून त्यांना सहज उपलब्ध होतात,आम्ही ह्या भागात गस्त वाढवली असून अनेक ठिकाणी पिंजरे लावले असून,नागरिकांनी देखील गरज नसल्यास रात्रीच्या वेळी बाहेर जाऊ नये अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत...
टीप व्हिडीओ वॉटस अप केला आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.