नाशिक - पदाने आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असले तरी कोणताही लवाजमा घेऊन न मिरवणे, कायम सामान्य माणसाप्रामाणे वागणारा आमदार म्हणून सर्वश्रृत असलेले, नाशिकचे आमदार नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा त्यांच्या याच स्वभावाला मुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या या चर्चेचा विषय आहे त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात केलेला संबळ डान्स.
विधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा तुफान चर्चेत आले आहेत. याचं कारणही तितकच खास आहे. आपल्या सुपुत्राच्या लग्नात आमदार झिरवाळ यांनी संबळवर ठेका धरला. त्यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्या नंतर त्यांनी गावराण भाषेत केलेल्या भाषणाने ते राज्यभर चर्चेत आले होते. झिरवळ यांची त्यांच्या मतदार संघातही तशीच ओळख आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष असले तरी कोणताही लवाजवमा घेऊन ते फिरत नाहीत. कधी ट्रॅक्टर तर कधी दुचाकीवर मतदार संघातील कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. त्यांच्या या सामान्य वागणुकीची मतदार संघात कायमच चर्चा असते. शिवाय ते गेल्या १५ वर्षांपासून या भागाचे नेतृत्व करत आले आहेत.
शरद पवार यांचा सच्चा शिलेदार अशी त्यांची राजकीय ओळख. याच नरहरी झिरवाळ यांच्या मुलाचा विवाहसोहळा मंगळवारी कंजाळी येथे पार पडला. फेसबुक लाईव्हद्वारे या सोहळ्याची दृश्य अनेक वऱ्हाडीमंडळींना पाहता आली. अनेकांनी झिरवाळ यांच्या मुलाला लग्नासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छाही दिल्या. या लग्नसोहळ्यात आनंद साजरा करताना झिरवाळ यांनी संबळ वाद्यावर तुफान डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. झिरवाळ हे नाशिकच्या दिंडोरी पेठ मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मंगळवारी त्यांच्या मुलाचा ऑनलाईन विवाहसोहळा पार पडला. या कौटुंबिक विवाह सोहळ्यात त्यांनी संबळवर ठेका धरून आनंद साजरा केला. काही दिवसांपूर्वी झिरवाळ यांनी सभागृहात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा आमदार झिरवाळ यांच्या डान्सची चर्चा रंगली आहे. सुपुत्र आणि सुनेला लग्नगाठ बांधल्यानंतर भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छाही दिल्या आहेत.